प्रयागराज : उमेश पाल हत्याकांडातील आरोपी गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची कोल्विन हॉस्पिटलबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांना आरोग्य तपासणीने हॉस्पिटमध्ये नेण्यात आले होते. माध्यमांशी बोलत असतानाच दोघांनाही हल्लेखोरांनी ठार केले. पोलिसांनी तिघांनाही घटनास्थळीच अटक केली आहे. लवलेश तिवारी, अरुण मौर्य आणि सनी अशी हल्लेखोरांची नावे आहेत.
-
Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023Uttar Pradesh | Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed shot dead while being taken for medical in Prayagraj. pic.twitter.com/8SONlCZIm0
— ANI (@ANI) April 15, 2023
पोलिसांनी माफिया अतिक आणि अशरफ यांना प्रयागराजमधील कोल्विन रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. न्यायालयाने दोघांनाही पाच दिवसांची कोठडी सुनावलेली आहे. पोलीस त्यांच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक रायफल घेऊन दोघांच्याही पुढे चालत होते. त्यांच्यासोबत अनेक प्रसारमाध्यमे प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी माईक घेऊन चालत होते. अतिक अहमदच्या मुलाचा पोलिसांनी एन्काउन्टर केल्याने माध्यमांना त्याची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. काळा टी-शर्ट घातलेला अशरफचा भाऊ अतीकच्या उजवीकडे होता. तर अतिकने पांढरा कुर्ता घालून डोक्यावर पांढरा गमजा बांधला होता.
-
#WATCH | Uttar Pradesh: Visuals from Prayagraj where Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead. pic.twitter.com/RBSDxTk5TY
— ANI (@ANI) April 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Uttar Pradesh: Visuals from Prayagraj where Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead. pic.twitter.com/RBSDxTk5TY
— ANI (@ANI) April 15, 2023#WATCH | Uttar Pradesh: Visuals from Prayagraj where Mafia-turned-politician Atiq Ahmed and his brother Ashraf Ahmed were shot dead. pic.twitter.com/RBSDxTk5TY
— ANI (@ANI) April 15, 2023
माध्यमांशी बोलत असतानाच हल्लेखोरांना झाडल्या गोळ्या- दोघे पोलीस व्हॅनमधून खाली उतरताच माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मुलगा असदच्या अंत्यसंस्काराला न जाण्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अतिक म्हणाले, 'आम्हाला नेण्यात आले नाही.' यानंतर अश्रफला गुड्डू मुस्लिमवर काही बोलायचे होते, मात्र तोंडातून 'मैं बात ये है की गुड्डू मुस्लिम' असे म्हणताच पडताच अचानक बंदुकीतून आलेली गोळी आतिकच्या डोक्यात लागली. रक्तबंबाळ अतिक खाली पडला. काही कळायच्या आत अश्रफवरही अंदाधुंद गोळ्या झाडण्यात आल्या.
एक पोलीस कर्मचारी व पत्रकारदेखील जखमी झाले- एकीकडे माध्यमांचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असताना काही कळायच्या आत दोन्ही माफियांचा गोळ्या लागून खाली कोसळले होते. हल्लेखोरांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. घटनेत एक पोलीस कर्मचारी व पत्रकारदेखील जखमी झाले आहेत. अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना तातडीने स्वरूपराणी नेहरू रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिथे डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
दोन विदेशी पिस्तुलांसह 58 काडतुसे जप्त- तिन्ही हल्लेखोर माध्यम प्रतिनिधी म्हणून बाईकवर आले होते. संधी मिळताच त्यांनी गोळ्या झाडून अतिक अहमद व त्याच्या भावाची हत्या केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर तपास पथकाची स्थापना केली आहे. या प्रकरणाची तीन सदस्यीय न्यायिक आयोग चौकशी करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन विदेशी पिस्तुलांसह 58 काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी जप्त केलेली काडतुसे ही पाकिस्तानची ऑर्डनन्स फॅक्टरी असल्याचे सांगण्यात येत आहे.
असद अहमदचे दोन दिवसांपूर्वी इनकाउंटर : अतिक अहमद 2005 मध्ये बसपा आमदार राजू पाल हत्याकांड आणि या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल खून प्रकरणात आरोपी होता. उमेश पाल हत्याकांडातील आरोपी अतिक अहमदचा मुलगा असद आणि गुलाम यांना गुरुवारी एसटीएफने चकमकीत ठार केले होते. असद 13 एप्रिल रोजी झाशी येथे झालेल्या चकमकीत मारला गेला होता. प्रयागराज येथील उमेश पाल खून प्रकरणात हे दोघेही वाँटेड होते, शुटर गुलामसह त्याची हत्या करण्यात आली होती.
5 लाखांचे बक्षीस होते : प्रत्येकाच्या डोक्यावर 5 लाखांचे बक्षीस होते. यावेळी विदेशी बनावटीची शस्त्रे जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या दिवशी चकमकीत असद मारला गेला त्याच दिवशी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील सीजेएम न्यायालयात आणण्यात आले. 24 फेब्रुवारी रोजी उमेश पाल यांच्या हत्येनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत माफियांना जमीनदोस्त केले जाईल, असे विधान केले होते. यानंतर माजी खासदार आणि बाहुबली अतिक अहमद सरकारच्या निशाण्यावर होता.