नवी दिल्ली - राजधानी दिल्ली शहराच्या जवळ असणाऱ्या ग्रेटर नोएडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. ग्रेटर नोएडाच्या दयानतपूर गावात एका 55 वर्षीय महिलेवर चार तरुणांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही महिला जनावरांनी चारा आणण्यासाठी गावापासून काही दूर जंगलात गेली होती. तेथे चाक तरुणांनी तिच्य़ावर सामूहिक बलात्कार केला. गंभीर अवस्थेत ही महिला घरी पोहोचल्यानंतर नातेवाईकांंनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासोबतच महिलेला रुग्णालयात दाखल केले. पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.
ही घटना आज सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास घडली. आराेपानुसार पीडित महिला जेथे जनावरांना चारा आणण्यासाठी गेली होती. तेथेच एक आरोपी आपली जनावरे चारत होता. सांगितले जात आहे, की तो तेथे गांजा ओढत होता. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 55 वर्षीय महिलेसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेबाबत डीसीपी वृंदा शुक्ला यांनी सांगितले की, आरोपींनी हा गुन्हा नशेत केला आहे.
हे ही वाचा - क्रूझ ड्रग्स पार्टीवरुन राणे-मलिक यांच्यात जुंपली.. सावध राहा तुमच्याच घरात कोणीतरी घुसेल - नवाब मलिक
आरोपींच्या अटकेसाठी पथके गठित करण्यात आली आहेत. आरोपींनी लवकरच अटक करण्यात येईल. पीडितेची प्रकृती स्थिर आहे.