ETV Bharat / bharat

Gangrape At Delhi Railway Station : राजधानी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार, चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक - दिल्ली रेल्वे स्टेशनवर गॅंगरेप

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या ( New Delhi Rilway Station ) फलाटावर बांधलेल्या खोलीत महिलेवर सामूहिक बलात्कार ( Gangrape ) झाल्याची घटना उघड झाली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार रेल्वे कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. यातील दोघांवर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर अन्य दोन कर्मचारी आरोपींसोबत तिथे उपस्थित होते.

Gangrape
Gangrape
author img

By

Published : Jul 23, 2022, 9:42 AM IST

नवी दिल्ली : चार रेल्वे कर्मचाऱ्यांनीच नवी दिल्ली रेल्वे स्टेशनच्या फलाटावर बांधलेल्या एका खोलीत महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी चार रेल्वे कर्मचाऱ्यांना ( Railway Employee Arrested For Rape ) अटक केली आहे. यातील दोघांवर महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, तर अन्य दोन कर्मचारी आरोपींसोबत तिथे उपस्थित होते. या संपूर्ण प्रकरणाचा तपास रेल्वे पोलिस करत आहेत.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित 28 वर्षीय महिला तिच्या कुटुंबासह राहते. काही काळापूर्वी तिची एका तरुणाशी ओळख झाली. त्याने सांगितले की, तो रेल्वेत काम करतो. गुरुवारी रात्री त्याने महिलेला भेटण्यासाठी रेल्वे स्टेशनवर बोलावून घेतले. तो तिला प्लॅटफॉर्म क्रमांक ८-९ वरील एका खोलीत घेऊन गेला. काही वेळाने त्याचे आणखी तीन मित्र दारूच्या नशेत तेथे आले. महिलेचा आरोप आहे की, यापैकी दोन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला तर इतर दोन आरोपी तिथे उपस्थित होते. या घटनेनंतर त्याने महिलेला धमकावून तिथून हाकलून दिले.

पोलिसांकडे तक्रार - बाहेर आल्यानंतर महिलेने पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली. त्याने पोलिसांना त्याच्या इतर तीन साथीदारांची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्यांनाही अटक केली. जगदीश, मंगल, विनोद आणि सतीश अशी त्यांची नावे आहेत. घटनेच्या वेळी चौघेही दारूच्या नशेत होते. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी रेल्वे कर्मचारी आहेत. रेल्वे पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - SPECIAL : मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील देवदुतांचे पथक वाऱ्यावर, बचाव साहित्याची वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.