हैदराबाद - शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केले आहे. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती. आरोपी हे विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत. यातील पाच जणांची ओळख पटली आहे. यातील तीन आरोपी अल्पवयीन आहेत. तर एकाला ३ तारखेला तर दुसऱ्याला ४ तारखेला सकाळी अटक केली आहे.
सदुद्दीन मलिक असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ४ तारखेला सकाळी आणखी एकाला अटक केली आहे. शनिवारी संध्याकाळी १७ वर्षीय मुलगी आपल्या मित्रासोबत पबमध्ये गेली होती. यावेळी तिचा मित्र तिथून लवकर निघाला होता. यानंतर तिची आरोपींमधील एका मुलासोबत ओळख झाली. घरी सोडतो असं सांगितल्याने तरुणी त्याच्यासोबत तेथून निघाली होती. यावेळी त्याचे मित्रही सोबत होते.
पार्टीला गेली होती मुलगी - पीडित मुलीच्या मित्रांनी अॅम्नेशिया अँड इन्सोम्निया पबमध्ये 28 मे रोजी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला पीडितेलाही आमंत्रित केले होते. पीडिता पार्टीला गेल्यानंतर तिथे तिची आरोपींबरोबर ओळख झाली. पार्टीनंतर संध्याकाळी 5.30 वाजता घरी जाण्यासाठी निघाली. पबमध्ये भेटलेल्या या आरोपींनी तिला घरी सोडतो, असे सांगून कारमध्ये बसण्यास सांगितले. या कारमध्ये आधीच 3-4 मुलं बसली होती. यानंतर आरोपी गाडी एका निर्जन स्थळी घेऊन गेले. त्यानंतर एका-एकाने आधी मुलीला मारहाण केली आणि मग अत्याचार केला. मुलीच्या शरीरावर जखमांच्या खुणाही असल्याचे वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. आरोपी गुन्हा करण्याआधी एका पेस्ट्री शॉपमध्ये गेले होते.
हेही वाचा - तुझे लग्न दुसरीकडे होऊच देणार नाही! 40 वर्षीय प्रेयसीच्या धमकीने हताश प्रियकराची आत्महत्या