लखनौ (यूपी) : विभूतीखंड पोलीस स्टेशन परिसरात शनिवारी ऑटोचालक आणि त्याच्या साथीदारांनी शिकवणीवरून परतणाऱ्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (Gang rape of girl student) केला. पीडितेने नराधमांना विरोध केल्याने तिला बेदम मारहाण (Rape victim beaten UP) करण्यात आली. यानंतर आरोपी मुलीला जखमी अवस्थेत हुसदिया चौकात फेकून फरार (gang raped and thrown in square) झाले. त्याचवेळी रविवारी विभूतीखंड पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून कारवाई सुरू केली आहे. (UP Crime News)
आरोपींच्या शोधार्थ पोलीस टीमचे गठन : पोलिस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर पीडित तरुणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यासाठी पोहोचली होती, मात्र ती काहीही सांगू शकली नाही. त्यामुळे एफआयआर लिहिण्यास विलंब झाला. पीडितेच्या तक्रारीवरून सामूहिक बलात्काराच्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून आरोपीला पकडण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे. पीडितेचे मेडिकल करण्यात आले आहे. या घटनेबाबत प्रभावी कारवाई करण्यात येत आहे.
बलात्कारानंतर मुलीला सोडून काढला पळ : पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शनिवारी दुपारी चारच्या सुमारास त्यांची मुलगी ट्यूशनवरून घरी परत येत होती. तिने काठौता चौकातून परत येण्यासाठी त्यांनी ऑटो घेतला. आरोपी आणि आणखी एक व्यक्ती ऑटोमध्ये बसले होते. यादरम्यान तिला संशय आला आणि तिने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऑटोमध्ये मागे बसलेल्या आरोपीने मुलीवर हल्ला केला आणि तिच्या डोक्याला मारले, त्यामुळे ती बेशुद्ध झाली. मुलगी बेशुद्ध पडल्यानंतर दोन्ही आरोपींनी तिला पॅलेसिओ मॉलच्या मागे असलेल्या झुडपात नेले आणि तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यादरम्यान आरोपीने त्यांच्या मुलीलाही जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर मुलीला बेशुद्धावस्थेत हुसदिया चौकात सोडून आरोपी पळून गेले.
तासाभराच्या प्रयत्नानंतर एफआयआर दाखल : घटनेनंतर घरी पोहोचलेल्या पीडितेने कुटुंबीयांना घटनाक्रम कथन केला. त्यानंतर कुटुंबीयांनी रात्री गोमतीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली; मात्र एफआयआर नोंदवताना गोमतीनगर पोलिसांनी घटना विभूती खांड पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे सांगितले. यानंतर पीडित कुटुंबाने विभूती खांड पोलीस ठाण्यात फेऱ्या मारल्या. तासाभराच्या प्रयत्नानंतर विभूती खांड ठाण्यात आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.