ETV Bharat / bharat

ममतांनी दुखापतीचे राजकारण करू नये; नितीन गडकरींचे आवाहन - नितीन गडकरी ईटीव्ही भारत मुलाखत

विमानात ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, ममता बॅनर्जींसोबत जे काही घडले तो अपघात होता, असे प्रत्येकजण म्हणत आहे. याचे राजकारण केले जाऊ नये. ममता बॅनर्जी आणि आम्ही (भाजप) जनतेच्या न्यायालयात जात आहोत. निर्णय स्वीकारून एखाद्याने पुढे जायला हवे.

NITIN GADKARI
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
author img

By

Published : Mar 15, 2021, 3:57 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या जनतेला मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे भावनिक राजकारण समजले आहे. यामुळे ते तृणमूल काँग्रेसच्या बाजून मतदान करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते नितीन गडकरी यांनी दिली. नंदीग्रामध्ये प्रचारादरम्यान धक्का लागल्याने ममता बॅनर्जी खाली पडल्या होत्या. या दुर्घटनेत त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली होती. दुर्घटनेनंतर ममतांना कोलकातामधील एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावर मंत्री गडकरी बोलत होते. 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने गडकरी यांच्या विशेष विमानात त्यांची मुलाखत घेतली. यावेळी ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ईटीव्ही भारतला दिलेली विशेष मुलाखत.

'अबकी बार 200 पार' -

विमानात ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, ममता बॅनर्जींसोबत जे काही घडले तो अपघात होता, असे प्रत्येकजण म्हणत आहे. याचे राजकारण केले जाऊ नये. ममता बॅनर्जी आणि आम्ही (भाजप) जनतेच्या न्यायालयात जात आहोत. निर्णय स्वीकारून एखाद्याने पुढे जायला हवे. दरम्यान, यानंतर गडकरी यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकीदरम्यान एका जनसभेला संबोधित करणार होते. ते म्हणाले, पक्षाने आधीच अबकी बार 200 पार हा नारा दिला आहे आणि भाजप जनतेच्या मताधिकाक्याने आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीने आपले लक्ष्य पूर्ण करेल.

हेही वाचा - ममता बॅनर्जी यांचा वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करावा; भाजपाची मागणी

तर मुख्य प्रकल्प पूर्ण करेन -

जनता जो काही निर्णय देईल, ते स्वीकारायला हवे. निवडणुकीतील वातावरण वाद निर्माण करुन खराब करणे, योग्य नाही. ममता बॅनर्जींसोबत जे घडले ते दुर्दैवीच आमहे. मात्र, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी याचे राजकारण करू नये, असेही विशेष मुलाखतीत म्हणाले. तसेच त्यांनी जनतेला विश्वास दिला की, जर जनतेने त्यांना मताधिक्य दिले त्यांचा रस्ते व परिवहन मंत्रालय विभाग येत्या दोन वर्षात मुख्य रेल्वे प्रकल्प पूर्ण करेल. दरम्यान, येत्या 27 मार्चपासून पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीला सुरुवात होत आहे. 29 एप्रिलला शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 2 मेला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा - व्हीलचेअरवरुन ममता बॅनर्जी यांची डरकाळी; म्हणाल्या... 'जखमी वाघीण जास्त घातक, खेला होबे'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.