ETV Bharat / bharat

पर्यटकांना खुणावत आहे गोठलेले दाल सरोवर - Frozen Dal lake news

यावर्षी थंडी तीव्र आहे. आम्ही आशा करीत आहोत की लवकरच येथे बर्फवृष्टी होईल, असे एका स्थानिकाने सांगितले.

dal
dal
author img

By

Published : Dec 20, 2020, 11:24 AM IST

श्रीनगर - या हंगामात पुरेशी बर्फवृष्टी न झाल्याने, थंडीच्या लाटांनी हंगामाच्या सुरूवातीला काश्मीर खोऱ्यातील मैदानांवर जोर धरला आहे.

'बर्फवृष्टीही होणार'

अनेक वर्षानंतर अशा तीव्रतेची शीतलहरी पाहिली जात असल्याचे खोऱ्यातील स्थानिकांनी सांगितले आहे. संपूर्ण तलाव गोठला होता, तेव्हा मी खूप लहान होतो. यावर्षी तशीत परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी थंडी तीव्र आहे. आम्ही आशा करीत आहोत की लवकरच येथे बर्फवृष्टी होईल, असे एका स्थानिकाने सांगितले.

दाल सरोवर येथे भेट देणारे पर्यटक आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया

'एक संस्मरणीय दृश्य'

खोऱ्यास भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी गोठविलेल्या तलावाला त्यांच्या सहलीचे मुख्य आकर्षण म्हटले आहे. झारखंडमधील एका पर्यटकाने सांगितले, की गोठलेले दाल सरोवर हे त्यांच्यासाठी एक संस्मरणीय दृश्य आहे. अनंतकाळ ते स्मरणार राहील.

'सहलीचा आनंद घेत आहोत'

मी इथे प्रथमच आलो आहे. आम्ही वैष्णोदेवीच्या दर्शनाला आलो. आता पुढे श्रीनगरला जाण्याचे आम्ही ठरवले आहे. वळसा घालणे हा एक चांगला निर्णय होता, कारण मी कधीही गोठलेला तलाव पाहिला नव्हता. मला हे दृष्य कायम लक्षात राहील. आम्ही आमच्या सहलीचा खूप आनंद घेत आहोत, पण इथे खूप थंड वातावरण आहे, असे एका पर्यटकाने सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.