भरतपूर - जिल्ह्यातील मेवात भागातील ठग देशभरात फसवणुकीच्या घटना घडवत आहेत. आता मेवातच्या ठगांनी शिवसेनेच्या आमदारासोबत सेक्स चॅट करून ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. आमदाराच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र पोलीस भरतपूरला पोहोचले आणि स्थानिक पोलिसांनी मिळून आरोपीला सिक्री भागातील एका गावातून अटक केली.
व्हिडिओ कॉलवरून केली Sex Chat -
सिक्री ठाण्याचे प्रभारी पूरन चंद यांनी सांगितले की, महाराष्ट्रच्या साइबर क्राइम ब्रांच (Cyber Crime Branch) चे एसआई राहुल खेतरे, एसआई गणेश सिरके, कांस्टेबल दीपक पाडलकर आणि अनिल वारे हे भरतपूर ला गेले होते. कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना एक व्हिडिओ कॉल आला होता. त्यावरून Sex Chat करून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.
साइबर क्राइम टीम भरतपूर साक्रीसाठी रवाना -
आरोपीने आमदारांना ब्लैकमेल (Blackmail) करून धमकी देत 5 हजारची रक्कम आपल्या खात्यात ट्रांसफर करण्यास सांगितले. याबाबत आमदारांनी साइबर सेलमध्ये तक्रार दिली होती. त्यानंतर साइबर क्राइम ब्रांच पोलिसांची टीम भरतपूर साक्रीसाठी रवाना झाली होती. आरोपीच्या मोबाईल लोकेशनच्या आधारवर तेस्की येथील निवासी मौसमदीनची ओळख पटली.
साइबर क्राइम ब्रांचच्या टीमच्या हाती देणार -
त्यानंतर सोमवारी अलसुबह या गावात पोलिसांनी छापा मारून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला महाराष्ट्रच्या साइबर क्राइम ब्रांचच्या टीमच्या हाती सोपवण्यात येणार आहे.
हेही वाचा - एसटी संपावर सामंजस्याने तोडगा काढणार - अनिल परब यांची माहिती; शरद पवार, अजित पवारांसोबत झाली बैठक