ETV Bharat / bharat

अँटिबॉडी तयार झाल्या नाहीत, अदर पूनावाला यांच्यासह 7 जणांविरोधात कोर्टात अर्ज - अँटीबॉडी

कोविशिल्ड लस घेतल्यानंतरही शरीरात अँटीबॉडीज विकसित न झाल्याने लखनऊमधील एका व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी लखनऊ न्यायालयात 2 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

अदर पूनावाला
अदर पूनावाला
author img

By

Published : Jun 30, 2021, 9:40 AM IST

लखनऊ - कोविशिल्डचा डोस घेतल्यानंतरही शरिरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडीज तयार न झाल्याने एका व्यक्तीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेविरोधात (आयसीएमआर) कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर कोर्टाने संबंधित पोलीस ठाण्याकडून अहवाल घेतला असून पुढील सुनावणी 2 जुलै रोजी करण्याचे आदेश दिले आहेत. लस घेतल्यानंतर शरिरात अँटीबॉडीज(प्रतिपिंड) तयार झाल्या नाहीच, तर सामान्य प्लेटलेट्सदेखील कमी झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.

फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 156 (3) अन्वये दाखल केलेल्या या अर्जात, केंद्रीय औषध मानक नियंत्रण महासंचालक, जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी, आयसीएमआरचे महासंचालक, आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय उत्तर प्रदेश हेल्थ मिशनचे संचालक आणि लखनऊच्या गोविंद हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक यांनाही पक्षकार करण्यात आले आहे. प्रताप चंद्रा यांनी न्यायालयात हा अर्ज दाखल केला आहे.

प्रताप चंद्रा यांनी कोविशिल्ड लसीचा पहिला डोस 8 एप्रिल 2021 रोजी गोविंद रुग्णालयात घेतला होता. दुसरा डोस 28 दिवसांनी घ्यायचा होता. परंतु यातच सरकारकडून दोन्ही डोसमधील अंतर वाढवण्यात आले. दुसरा डोस 12 आठवड्यांनंतर मिळेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. लस घेतल्यानंतर प्रकृती बिघडल्याने चंद्रा यांनी 25 मे 2021 रोजी अँटीबॉडी चाचणी केली. तेव्हा अँटीबॉडीज तयार झाल्या नसून उलट सामान्य प्लेटलेट्स देखील कमी झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. लसीच्या नावाखाली त्यांच्या आयु्ष्यासोबत छेडछाड केली गेली असून ही सरासरी फसवणूक आहे, असे चंद्रा यांनी म्हटलं आहे.

अँटीबॉडी म्हणजे काय?

कोरोना व्हायरसपासून लढण्यासाठी अँटीबॉडीज महत्त्वाची भूमिका निभावतात. शरिरात एखादा विषाणू पसरला तर रक्तात आणि टिश्यूमध्ये असणारी अँटीबॉडी तयार होऊ लागतात. त्या विषाणूला शरिरात पसरण्यापासून थांबवतात. रोगप्रतिकारशक्ती चांगली असणाऱ्या व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडी कमी काळात म्हणजे दोन आठवड्यांच्या आतच निर्माण होतात. कोरोनापासून बचावासाठी अँटीबॉडीचं महत्त्व अधिक आहे.

हेही वाचा - अदर पूनावाला पुण्यात परतले, मोठ्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याने सोडला होता देश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.