नवी दिल्ली : दिल्लीतील इशान्य भागात बुरारी जवळ यमुना नदीत आंघोळीसाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले आणि तीन मृतदेह बाहेर काढले. एकाचा शोध सुरू आहे. सर्व मुले लोणी येथील रहिवासी होती. पोलिसांनी तीन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत.
पोलिसांनी सांगितले की, हे चारही मुले गुरुवारी दुपारी 1.30 वाजता यमुनेत स्नान करण्यासाठी गेले होते. सायंकाळपर्यंत सर्वजण घरी न पोहोचल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. इतर लोकांकडून समजले की सर्व यमुनेत बुडाले आहेत. दुपारी दीडच्या सुमारास बुरारी पोलीस ठाण्यात मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली. कमल (17), इलियास (20) आणि वसीम (15) अशी तिघांची नावे आहेत. चौथा मुलगा कमल याचा शोध सुरू आहे.
हेही वाचा - उत्तराखंड : पर्यटकांनी भरलेली कार ढेला नदीत कोसळली, 9 जणांचा मृत्यू, 6 मृतदेह सापडले