ETV Bharat / bharat

Bihar Crime : तिरस्करणीय! मदरशाच्या शौचालयात चिमुरडीवर बलात्कार, आरोपी फरार - मदरशाच्या शौचालयात मुलीवर बलात्कार

बिहारमधील बगाहामध्ये मदरशाच्या शौचालयात मुलीवर बलात्कार झाला. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून मौलवी तेथे पोहोचले. मात्र त्यांना पाहून आरोपी फरार झाला. या घटनेनंतर संपूर्ण गावात तणावाचे वातावरण आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 23, 2023, 9:09 AM IST

पटणा ( बिहार ) : बिहारमधील रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका मदरशाच्या शौचालयात 4 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला आहे. पोलीस कुटुंबीयांच्या जबाबावरून एफआयआर नोंदवून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. ही घटना सोमवारी घडली आहे. गावातीलच एका तरुणाने चिमुरडीवर बलात्कार केल्याचे बोलले जात आहे.

मदरशाच्या शौचालयात मुलीवर बलात्कार : घटना गावातील मदरशात असलेल्या शौचालयात घडली आहे. घटनेच्या वेळी मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मौलवी येत असल्याचे पाहून आरोपी पळून गेला. पीडित मुलीच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे की, या घटनेनंतर गावातील लोकांनी आधी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. मात्र बुधवारी मुलीची आई आणि कुटुंबीयांनी रामनगर पोलीस स्टेशन गाठून त्यांच्या मुलीसोबत घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केली. त्यानंतर कुटुंबीयांच्या अर्जाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा क्रमांक 79/23 मध्ये गुन्हा दाखल केला आहे.

मुलीच्या आईने सांगितली संपूर्ण घटना : पीडितेच्या आईने दिलेल्या अर्जात असे म्हटले आहे की, सोमवारी सुट्टीनंतर गावातील एका १८ वर्षीय तरुणाने त्यांच्या मुलीवर जबदस्ती केली. त्यानंतर, मुलीचा गळा दाबण्याचाही प्रयत्न केला. त्यावेळी मुलीचा आरडाओरडा ऐकून मौलवी शौचालयाच्या दिशेने गेले. मौलवी येताना पाहून आरोपीने तिथून पळ काढला. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. कुटुंबीय कारवाईसाठीच्या त्यांच्या भूमीकेवर ठाम आहे.

गावात दोन बाजूंमध्ये तणाव : चिमुरडीवर बलात्कार झाल्यानंतर गावात तणावाचे वातावरण आहे. लोक दोन बाजूंनी विभागले गेले आहेत. एकीकडे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचे पहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूने पिडीतेचे कुटुंब पोलिसांकडे कारवाईसाठी गेले आहे. पोलीस स्टेशनचे प्रमुख अनंत राम यांनी सांगितले की, पीडितेच्या आईच्या अर्जावरून एफआयआर नोंदवण्यात आला आहे. मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जीएमसीएच बेतिया येथे पाठवण्यात आले. पोलीसही तपास करत आहेत. आरोपीला पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे, असे पोलीस स्टेशन प्रमुख अनंत राम यांनी सांगितले.

गुवाहाटीमध्ये श्रद्धा हत्याकांडासारखी घटना : आसाममधील गुवाहाटीमध्ये एका पत्नीने पती, सासू यांची हत्या केली. त्यानंतर त्यांचे मृतदेह तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर महिलेने प्रियकराच्या मदतीने त्या मृतदेहांचे तुकडे मेघालयातील डौकीच्या डोंगराळ भागात फेकून दिले. तेथील पोलिसांनी घटनेनंतर सात महिन्यांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. पती व सासू यांचे मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळले होते. दरम्यान या घटनेने देशभरात चिंतेचे वातावरण तयार केले आहे.

हेही वाचा : Rakhi Sawant Came To Mysore Court : हिंदू असल्यामुळे आदिलचे वडील मला स्वीकारत नाहीत-राखी सावंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.