ETV Bharat / bharat

'ब्लॅक'नंतर आता 'व्हाईट फंगस'ची भीती! बिहारमध्ये आढळले चार रुग्ण

बिहारची राजधानी पाटणामध्ये 'व्हाईट फंगस'चे काही रुग्ण आढळले आहेत. पीएमसीएचचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र नारायण सिंह यांनी पुष्टी केली आहे.

'ब्लॅक'नंतर आता 'व्हाईट फंगस'ची भीती! बिहारमध्ये आढळले चार रुग्ण
'ब्लॅक'नंतर आता 'व्हाईट फंगस'ची भीती! बिहारमध्ये आढळले चार रुग्ण
author img

By

Published : May 20, 2021, 4:55 PM IST

नवी दिल्ली - देशात कोरोनाने कहर केला आहे. यात आता ब्लॅक फंगस म्हणजेच 'म्युकरमायकोसीस' भीती नागिरकांना सतावत आहे. बिहारची राजधानी पाटणामध्ये 'व्हाईट फंगस'चे काही रुग्ण आढळले आहेत. पीएमसीएचचे मायक्रोबायोलॉजी विभागाचे अध्यक्ष डॉ. सत्येंद्र नारायण सिंह यांनी पुष्टी केली आहे.

बिहारमध्ये आढळले व्हाईट फंगसचे चार रुग्ण

चारही रूग्णांमध्ये कोरोना सारखी लक्षणे असल्याचे नोंदवण्यात आले आहे. त्यांची कोरोनाची चाचणी घेण्यात आली. मात्र, ती नकारात्मक आली. मात्र, त्यांच्या फुफ्फुसावर संक्रमण झाले आहे. तपासनीनंतर त्यांना अँटीफंगल देण्यात आले आहे, असे पाटणा मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. एसएन सिंह यांनी सांगितले.

व्हाईट फंगस जास्त धोकादायक नाही. हा आजार नवीन नाही आणि त्वरित अँटीफंगस औषध दिल्यास तो बरा होते. व्हाईट फंगसमुळे शरीराच्या अनेक अवयवांवर परिणाम होतो. याआधी एचआयव्ही रूग्णांमध्येही व्हाईट फंगसची समस्या दिसून आली आहे. व्हाईट फंगस 'कमी रोगप्रतिकारशक्ती' असलेल्या व्यक्तीस संक्रमित करते, असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. दिवाकर तेजस्वीशी यांनी सांगितले.

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांनी खबरदारी घ्यावी -

व्हाईट फंगस फुफ्फुसाव्यतिरिक्त त्वचा, नखे, तोंडातील अंतर्गत भाग, आतडे, मूत्रपिंड आणि मेंदूला संक्रमित करू शकतो. व्हाईट फंगस नवीन आजार नाही. सहसा, ज्या रुग्णांमध्ये रोग प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांच्या शरीराच्या अवयवांना या रोगाचा त्रास होऊ शकतो, परंतु सामान्य अँटीफंगल औषधांसह, या रोगाचा उपचार केला जाऊ शकतो. व्हाईट फंगस टाळण्यासाठी ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची उपकरणे विशेषत: नळ्या इत्यादी जीवाणू मुक्त असाव्यात. रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये जाणारा ऑक्सिजन फंगसमुक्त असावा.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.