ETV Bharat / bharat

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेत आत्महत्या - family commits suicide in Chamarajnagara

एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्नाटकाच्या चामराजनगरात ही घटना घडली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

आत्महत्या
आत्महत्या
author img

By

Published : Jun 2, 2021, 5:15 PM IST

बंगळुरू - कर्नाटकाच्या चामराजनगरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी राहत्या घरामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चामराजनगर तालुक्यातील एच. मुकाहल्ली गावात ही घटना घडली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप कळालेले नाही.

गावातील महादेवप्पा कुटुंबाने आत्महत्या केली. आज सकाळी महादेवप्पा, त्यांची पत्नी मंगलमा, मुलगी गीता आणि श्रुती यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

व्हाट्सअ‌ॅपवर भावनिक स्टेटस ठेऊन तरुणाची आत्महत्या -

व्हॉट्सअ‌‌ॅपवर भावनिक स्टेटस ठेऊन एका तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना महाराष्ट्राच्या जळगावातील अयोध्यानगर परिसरातील सद्गुरू नगरात मंगळवारी रात्री घडली. मानसिक तणावातून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी हर्षलने त्याच्या व्हॉट्सअ‌‌ॅपवर एक भावनिक स्टेटस ठेवले होते.

आत्महत्येचे प्रमाण -

जागतिक आरोग्य संघटनेने 10 सप्टेंबर हा दिवस जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा केला जातो. कोरोना महासाथीच्या काळात, वर्ष एकाकीपणामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या झाल्याची नोंद झाली आली. महामारीच्या आजारामुळे समाजामध्ये असहाय्यता, अनिश्चितता,एकांतवास आणि आर्थिक ताण तणाव व नात्यांमध्ये दुरावा वाढला आहे. आत्महत्येची समस्या जरी बिकट असली, तरी भारतात इतर देशांशी तुलना करता आत्महत्येचे प्रमाण फार कमी आहे. आत्महत्या करण्यामागे कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही दोन मुख्य कारणं असल्याचे आतापर्यंत निदर्शनास आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.