जशपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील बागिचा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाडी कोरवा कुटुंबातील 4 जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतांमध्ये पालकांसह दोन मुलांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती - पत्नीने प्रथम मुलांची हत्या केली आणि नंतर स्वत: गळफास घेतला. समर बहार गावच्या झुमरा डुमर टाऊनशिपपासून हाकेच्या अंतरावर चौघांचे मृतदेह झाडाला लटकले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
पहाडी कोरवा जमात : पहाडी कोरवा जमात ही छत्तीसगडमध्ये आढळणाऱ्या 42 आदिवासी जमातींपैकी एक आहे. पहाडी कोरवा या जमातीला राष्ट्रपतींच्या दत्तक पुत्रांचे स्थान मिळाले आहे. राज्य सरकारनेही त्यांना विशेष मागास जमातीचा दर्जा दिला आहे. पहाडी कोरवा जमात ही छत्तीसगडच्या पूर्व भागात राहणाऱ्या आदिवासींची एक जमात आहे. त्यांची स्वतःची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, सभ्यता आणि संस्कृती आहे. या जमातीवरील वाढता धोका लक्षात घेऊन भारत सरकारने त्यांना संरक्षित यादीत स्थान दिले आहे. ते अजूनही छत्तीसगडच्या घनदाट जंगलात राहतात.
अनोखी आहे कोरवा जमात : या आदिवासी समाजाच्या चालीरीती खूप वेगळ्या आणि कठीण आहेत. पहाडी कोरवा यांच्या घरी कोणाचा मृत्यू झाला तर घरातील सदस्य घर सोडून जातात. प्रत्येक मृत्यूनंतर त्यांचे घर बदलण्याची प्रक्रिया सुरू असते. कोरवा जमातीच्या जीवनशैलीबरोबरच त्यांचे अन्नही वेगळे आहे. ते मातीच्या भांड्यात अन्न शिजवतात. फळे, फुले, कंदमुळे आणि जे काही जंगलातून मिळते ते त्यांच्या जगण्याचे साधन आहे.
नागपूरच्या बँकेची 16 लाख रुपयांची फसवणूक : नागपूरच्या पंजाब नॅशनल बँकेतून प्रकाश जैन या बड्या उद्योजकाच्या नावावर काही खात्यांमध्ये 16 लाख रुपये ट्रान्सफर झाले होते. प्रकरणाची तपासणी केली असता याचे संबंध बिहारशी जोडले असल्याचे आढळून आले. त्यानंतर आता नागपूर पोलीस बिहारच्या सिवानला पोहचून पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी सध्या या प्रकरणी काहीही सांगण्यास नकार दिला आहे.