ETV Bharat / bharat

झारखंडमध्ये चारचाकीची उभ्या असलेल्या ट्रकला धडक, 4 ठार - Jharkhand collided to truck news

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील छतरपूर पोलीस ठाणे भागात गुरुवारी रात्री एका तिलक समारंभासाठी गेलेल्या लोकांची चारचाकी ट्रकला धडकून झालेल्या अपघातात बिहारमधील चार जण ठार झाले. हे सर्वजण समारंभ संपल्यानंतर परत निघाले होते. संजय प्रसाद, सरयू प्रसाद, उमेश साव आणि संजय कुमार अशी मृतांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

झारखंड अपघात न्यूज
झारखंड अपघात न्यूज
author img

By

Published : Nov 27, 2020, 7:06 PM IST

डालटेनगंज - झारखंडच्या पलामू जिल्ह्यातील छतरपूर पोलीस ठाणे भागात गुरुवारी रात्री एका तिलक समारंभासाठी गेलेल्या लोकांची चारचाकी ट्रकला धडकून झालेल्या अपघातात बिहारमधील चार जण ठार झाले. हे सर्वजण समारंभ संपल्यानंतर परत निघाले होते.

हेही वाचा - नौदलाचे मिग-29 के अपघातग्रस्त; एका वैमानिकाला वाचविले तर, दुसऱ्याचा शोध सुरू

'बिहारच्या नवीननगर येथील रहिवासी संजय प्रसाद (वय 55) यांच्या गाडीचा छतरपूरच्या महिंद्रा पेट्रोल पंपाजवळ उभे असलेल्या ट्रकला धडकून अपघात झाला. ते त्यांच्या मुलीच्या लग्नाचा तिलक कार्यक्रम करून पलामूच्या शाहपूर गावातून परत येत होते. या अपघातात कारमधील दोन लोकांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जणांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले,' असे छतरपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) शंभू कुमार सिंह यांनी सांगितले.

संजय प्रसाद, सरयू प्रसाद, उमेश साव आणि संजय कुमार अशी मृतांची नावे असल्याचे सिंह यांनी सांगितले. अपघातानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - प्रवासी गाढ झोपेत असताना 'हाय व्होल्टेज' तारेला बसचा स्पर्श

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.