ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) - मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून एक खळबळजनक घटना घडली आहे. महाराजपुरा परिसरात एकाच कुटुंबातील ४ जणांचे मृतदेह घरात आढळल्याने खळबळ उडाली ( Gwalior Family Members Dead Body Found) आहे. ही घटना महाराजपुरा गावत घडली आहे. शाळेतील कर्मचारी जितेंद्र वाल्मिकी, त्यांची पत्नी निर्जला आणि मुलगा कुलदीप, मुलगी जान्हवी यांचे मृतदेह घरात आढळून आले. माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली. चारही मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
खोलीत सापडला संपूर्ण कुटुंबाचा मृतदेह : घटनेनंतर पोलीस घटनास्थळी तपासासाठी पोहोचले असता, जितेंद्र वाल्मिकी (२७) नावाच्या व्यक्तीचा आणि त्याच्या ४ वर्षाच्या मुलाचा मृतदेह एका खोलीत लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर तेथे पत्नी निर्जला (24) आणि दीड वर्षाच्या मुलीचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. जितेंद्र वाल्मिकी हे आयरा वर्ल्ड स्कूलमध्ये सफाई कामगार होते. सकाळपासून दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्याने घरात डोकावले असता ही घटना उघडकीस आली. त्यामुळे त्यांनी सर्वांचे मृतदेह पाहिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती जितेंद्रने पत्नी आणि मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली. जितेंद्रने सर्वप्रथम पत्नी निर्जला आणि एका 2 वर्षाच्या मुलीची विष देऊन हत्या केली आहे. यानंतर मुलगा कुलदीप याला फासावर लटकवून आत्महत्या केली.
हे आहे संपूर्ण प्रकरण : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांच्या चौकशीत सफाई कामगाराची सासू गुरुवारी रात्री घरी आल्याचे समोर आले आहे. त्यानंतर त्यांच्यात जोरदार भांडण झाले. घटनास्थळी दारूची बाटली आणि गर्भनिरोधक गोळ्याचे रिकामे रॅपरही सापडले. जितेंद्रने घटनेपूर्वी दारूचे सेवन केले होते, असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम हाऊसकडे पाठवले आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
हेही वाचा - Cobra Video : कोब्राने गिळले दोन मैना पक्षी; अन् गुंतले तोंडात, पुढे झाले असे काही... पाहा व्हिडिओ