ETV Bharat / bharat

Mulayam Singh Yadav मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मुलायम सिंह यादव 82 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आजारी होते. मुलायम सिंह यादव यांना छातीत जंतुसंसर्ग, युरिन इन्फेक्शन आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ( CM Mulayam Singh Yadav passes away )

मुलायम सिंह यादव
मुलायम सिंह यादव
author img

By

Published : Oct 10, 2022, 10:03 AM IST

Updated : Oct 10, 2022, 10:51 AM IST

लखनौै - उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले. मुलायम सिंह यादव यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात सकाळी 8.16 वाजता अखेरचा श्वास घेतला. मुलायम सिंह यादव यांना 22 ऑगस्ट रोजी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १ ऑक्टोबरला रात्री आयसीयूमध्ये हलवण्यात आले. मेदांता यांच्या डॉक्टरांची समिती मुलायमसिंह यादव यांच्यावर उपचार करत होती. (Mulayam Singh Yadav death )

मुलायम सिंह यादव 82 वर्षांचे होते आणि दीर्घकाळ आजारी होते. मुलायम सिंह यादव यांना छातीत जंतुसंसर्ग, युरिन इन्फेक्शन आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे गुरुग्राममधील मेदांता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ( CM Mulayam Singh Yadav passes away )

युरिन इन्फेक्शन आणि रक्तदाबाचा त्रास होतासमाजवादी पक्षाचे जेष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. (mulayam singh yadav health). मिळालेल्या माहितीनुसार, मुलायम सिंह यादव यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. रविवारी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये ( Samajwadi party Mulayam Singh Yadav Died ) हलवण्यात आले होते. त्यांना युरिन इन्फेक्शन आणि रक्तदाबाचा त्रास होता. ( mulayam singh yadav in icu).

यादव कुटुंब दिल्लीला रवाना: मुलायम सिंह यादव यांची प्रकृती खालावल्याची माहिती मिळताच यांचे पुत्र आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे पत्नी डिंपल व मुलगा अर्जुनसह दिल्लीला रवाना झाले होते. मुलायम यांचे धाकटे भाऊ शिवपाल सिंह यादव, मुलायम यांची धाकटी सून अपर्णा यादवही दिल्लीत पोहोचल्या होत्या. याशिवाय कुटुंबातील इतर सदस्य त्यांचे मूळ गाव सैफई हून गुरुग्रामला पोहोचले होते.

उत्तर प्रदेश सरकारकडून तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर दिग्गज राजकारणी मुलायमसिंह यादव यांच्या निधनाबद्दल उत्तर प्रदेश सरकारने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे. मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर उत्तर प्रदेशातील वडिलोपार्जित गाव सैफई येथे होणार अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Last Updated : Oct 10, 2022, 10:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.