ETV Bharat / bharat

Akhilesh Yadav Meeting Lalu Yadav: सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट - Lalu Prasad Yadav in Delhi

लोकसभा निवडणुकीचे दिवस जसजसे जवळ येऊ लागले आहेत, तसतसा विरोधी पक्षांमधील बैठकांचा सिलसीला अधिक जलद झाला आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लालू यादव यांची भेट घेतली आहे. आता त्यांनी ही भेट तब्येतच्या कारणाने घेतली की आणखी काही राजकीय कारण आहे याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहेत.

Akhilesh Yadav Meeting Lalu Yadav
सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी घेतली लालू प्रसाद यादव यांची भेट
author img

By

Published : Apr 27, 2023, 3:55 PM IST

दिल्ली/पाटणा: उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे बैठक झाली. लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवस बाकी आहेत. असे असताना भाजपला टक्कर देण्यासाठी आणि विरोधी एकजूट मजबूत करण्यासाठी राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीत असे सध्या चित्र आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लखनऊमध्ये सपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या बैठकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या रणनीतीवर दोन्ही नेत्यांकडून जोरदार चर्चा करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपुर्वीच अखिलेश यादव यांची आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट झाली होती.

  • आदरणीय लालू जी से एक ‘कुशलक्षेम-मुलाक़ात’। pic.twitter.com/gNivO8H3xz

    — Akhilesh Yadav (@yadavakhilesh) April 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लालूंच्या प्रकृतीचीही विचारपूस : मीसा भारती यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. 20 मिनिटे अखिलेश यादव आरोग्यापासून राजकारणापर्यंत सर्व काही लालू यादव यांच्याकडे विचारपुस केली. अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर या बैठकीला 'कुशलक्षेम बैठक' असे संबोधले आहे. लालू यादव यांच्या भेटीदरम्यान त्यांनी लालूंच्या प्रकृतीचीही विचारपूस केली आणि यूपी-बिहारच्या राजकारणावरही चर्चा केली. किडनी प्रत्यारोपणानंतर लालू यादव यांच्या प्रकृतीत दिवसेंदिवस सुधारणा होत आहे.

काही दिवसांपुर्वीच नितीश कुमार यांची भेट : यामध्ये नुकतीच, 24 एप्रिल रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यात बैठक पार पडली. त्यावेळी या तीन्ही नेत्यांनी भाजपचा पराभव करण्यासाठी विरोधकांनी एक होणे गरजेचे आहे असे मत मांडले होते. यादरम्यान त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर ही बैठक शेअर करताना लिहिले की, लोकशाही, संविधान आणि आरक्षण संपवण्याचे षड्यंत्र भाजपकडून रचले जात आहे. त्या विरोधात ही भेट होती. तसेच, एक संयुक्त बैठक आयोजीत केली जाईल असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा : Mahila Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत खासदार ब्रिजभूषण सिंह यांना बोलावल्याने वाद; दिपाली सय्यद यांची कार्यक्रमाकडे पाठ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.