कानपूर: अनेकदा ती घरे नेहमीच चर्चेत असतात, ज्यात व्हीव्हीआयपी, व्हीआयपी लोक अभिनेते किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातील प्रतिष्ठीत प्रसिद्ध आणि खास लोक राहतात. असेच एक घर कानपूर शहरातील इंद्र नगर भागातील दयानंद विहारमध्ये होते. आत्तापर्यंत त्या घरात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद राहत होते. (President Ram Nath Kovind house in Kanpur) माजी राष्टपतींचे अशी ओळख असलेल्या या घरात आता इंद्र नगर येथील रहिवासी डॉ.शरद कटियार हे त्यांच्या पत्नी डॉ.सृती कटियारसोबत राहणार आहेत. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या या निवासस्थानाची शुक्रवारी विक्री करण्यात आली(Ram Nath Kovind house sold) आणि हे घर डाॅ कटियार दाम्पत्यांने विकत घेतले.
माजी राष्ट्रपतींच्या काळजीवाहूने केली रजिस्ट्री : इंद्र नगर येथील कान्हा श्याम रेसिडेन्सी येथे राहणारे डॉ. शरद कटियार यांनी सांगितले की, माजी राष्ट्रपतींनी दिल्लीत पॉवर ऑफ ऑटर्नीची प्रक्रिया पूर्ण केली होती. गेली अनेक वर्षे त्यांचा जवळचा मित्र आनंद हा केअर टेकर म्हणून या घराची देखभाल करत होता. शुक्रवारी रजिस्ट्रीदरम्यान आनंद न्यायालयात हजर होता. डॉ.शरद म्हणाले की, आता ते घर माझ्या पत्नी डॉ.सृतीच्या नावावर आहे. माजी राष्ट्रपतींकडून आम्हाला ही दिवाळी भेट मिळाली आहे. दिवाळीला या घरात पूजा केल्यानंतर ते इथे रहायला येणार आहेत. ते पुढे म्हणाले की, जेव्हा कधी आम्ही घरासमोरून जायचो तेव्हा आम्ही त्या घराकडे पहायचो असे वाटायचे की एक दिवस हे घर विकत घ्यावे.
25 वर्षांपूर्वी बांधले होते घर : परीसरातील रहिवासीयांनी या घरा बद्दल सांगितले की, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 25 वर्षांपूर्वी हे घर बांधले होते. रामनाथ कोविंद हे त्यावेळी वकील होते. राजकारणात आल्यानंतर ते जेव्हा जेव्हा कानपूर दौऱ्यावर येत असत, तेव्हा ते अनेकदा दयानंद विहार येथील निवासस्थानी राहत असत. माजी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता कोविंद यांची या घराशी खूप ओढ होती. आता या घराला नविन पाहुणा मिळाला आहे.