नवी दिल्ली : दिल्ली सरकारचे माजी मंत्री सत्येंद्र जैन यांना गुरुवारी सकाळी तिहार तुरुंगातील बाथरूममध्ये पडल्याने दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात येत आहे. सत्येंद्र जैन यांची प्रकृती खाल्यावल्याने त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बाथरूममध्ये घसरून पडले सत्येंद्र जैन : गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सत्येंद्र जैन हे मध्यवर्ती कारागृह क्रमांक सातच्या रुग्णालयातील एमआय रूमच्या बाथरूममध्ये घसरून पडले. त्यानंतर त्यांना अशक्तपणामुळे डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले होते. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता, त्यांची नाडी सामान्य होती. पाठ, डावा पाय आणि खांदा दुखत असल्याच्या तक्रारीमुळे त्यांना डीडीयू हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मात्र प्रकृती खाल्यावल्याने त्यांना दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या अगोदरही झाली होती दुखापत : याआधीही सत्येंद्र जैन हे बाथरूममध्ये पडून त्यांना पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली होती. यापूर्वी सोमवारी त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते, जिथे त्यांना न्यूरोसर्जनने तपासले होते. यादरम्यान त्यांच्या समोर आलेल्या फोटोत सत्येंद्र जैन हे खूपच कमजोर दिसत होते. डॉक्टरांच्या मतानुसार त्यांचे वजन 35 किलोने कमी झाले आहे.
जैन एक वर्षापासून तिहार तुरुंगात : दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन हे जवळपास वर्षभरापासून मनी लाँड्रिंग प्रकरणात तिहार तुरुंगात बंद आहेत. गेल्या एक वर्षापासून त्यांनी फक्त फळे खाल्ली असून नियमित आहार घेतला नाही. सत्येंद्र जैन यांनी यापूर्वी न्यायालयाला विनंती केली करुन आपण धार्मिक परंपरांचे पालन करत असून मंदिरात गेल्याशिवाय शिजवलेले अन्न खात नाही. ते दररोज प्रथम मंदिरात जातात, नंतर शिजवलेले अन्न खात असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सत्येंद्र जैन यांच्यावर दोन शस्त्रक्रिया : सत्येंद्र जैन यांच्या मागील वर्षभरात मणक्याशी संबंधित दोन शस्त्रक्रिया झाल्या आहेत. असे असूनही, त्यांच्या नियमानुसार त्यांनी सुमारे 358 दिवस शिजवलेले अन्न सोडले आहे. ते फक्त फळे आणि कच्च्या भाज्यांवर जगत आहेत. डॉक्टरांच्या मतानुसार शिजवलेले अन्न न घेतल्याने त्यांच्या स्नायूंना गंभीर नुकसान झाले आहे. या स्थितीला मस्क्यूलर ऍट्रोफी देखील म्हणतात. त्यामुळेच गेल्या वर्षभरात सत्येंद्र जैन यांचे ३५ किलो वजन कमी झाले आहे.
हेही वाचा -
- Uddhav Thackeray News: राष्ट्रीय नेत्यांच्या मातोश्रीवर वाढल्या भेटीगाठी, उद्धव ठाकरे यांचे महत्त्व का वाढत आहे?
- PM Modi Returns To India : तीन देशाचा दौरा करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतले, भाजपने केले जंगी स्वागत
- Nitin Gadkari Extortion Case : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खंडणी प्रकरण; आता एनआयए करणार जयेश पुजारीचा तपास