लखनौ - सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर बलात्कार पीडितेने जाळून घेतल्याच्या घटनेत पोलिसांनी माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांना अटक केली आहे. एसआयटी चौकशीनंतर हजरतगंज पोलिसांनी हजरतगंज न्यायालयात माजी आयपीएस अमिताभ ठाकूर आणि बसपा खासदार अतुल राय यांच्यावर शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी अटक केल्याची माहिती माजी आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकूर यांनी ट्विट करून दिली आहे. पीडितेला आत्मदहन करण्यास प्रवृत्त करणे, गुन्ह्याचा कट रचणे आणि कारस्थान करून कागदपत्रे बनविणे या आरोपाखाली अमिताभ ठाकूर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमिताभ ठाकूर यांनी शुक्रवारी (आज) सकाळी अधिकार सेना या नावाच्या पक्षाची स्थापना केली होती. पोलिसांनी ठाकूर यांना घरात नजरकैदेत ठेवले होते.
हेही वाचा-कोडरमा औष्णिक प्रकल्पात लिफ्ट कोसळल्याने चार जणांचा मृत्यू; मृतामध्ये महाराष्ट्राचे दोन
चौकशी समितीच्या तपासानंतर अटकेत होते अमिताभ ठाकूर
दिल्लीमधील सर्वोच्च न्यायालयाबाहेर बलात्कार पीडिता आणि त्याच्या मित्राने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. दोघांनीही लाईव्ह व्हिडिओमध्ये बसपा खासदार अतुल रायवर बलात्काराचा आरोप केला होता. तर खासदाराच्या इशाऱ्यावरून अमिताभ ठाकूर यांनी त्रास दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन प्रकरणाचा तपास नीरा राव आणि आर. के. विश्वकर्मा यांच्याकडे सोपविला होता. चौकशी समितीने दोन आठवड्यांमध्ये सरकारने अहवाल सादर केला आहे. चौकशी समितीने गोरखपूरला जाणाऱ्या अमिताभ ठाकूर यांना 23 ऑगस्टला अटक करून घरात नजरकैदेत ठेवले होते.
-
भूतपूर्व पुलिस के विरुद्ध भाजपा सरकार की पुलिस का अभूतपूर्व कार्य!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 27, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
भाजपाई राजनीति लोगों के बीच दरार पैदा करके ही जिंदा है. अब भाजपा सरकार के दबाव के कारण पुलिस ही पुलिस के ख़िलाफ़ काम करने पर मजबूर है. एक सेनानिवृत आईपीएस के साथ ऐसा व्यवहार अक्षम्य है. #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/o7OG4XRAMy
">भूतपूर्व पुलिस के विरुद्ध भाजपा सरकार की पुलिस का अभूतपूर्व कार्य!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 27, 2021
भाजपाई राजनीति लोगों के बीच दरार पैदा करके ही जिंदा है. अब भाजपा सरकार के दबाव के कारण पुलिस ही पुलिस के ख़िलाफ़ काम करने पर मजबूर है. एक सेनानिवृत आईपीएस के साथ ऐसा व्यवहार अक्षम्य है. #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/o7OG4XRAMyभूतपूर्व पुलिस के विरुद्ध भाजपा सरकार की पुलिस का अभूतपूर्व कार्य!
— Akhilesh Yadav (@yadavakhilesh) August 27, 2021
भाजपाई राजनीति लोगों के बीच दरार पैदा करके ही जिंदा है. अब भाजपा सरकार के दबाव के कारण पुलिस ही पुलिस के ख़िलाफ़ काम करने पर मजबूर है. एक सेनानिवृत आईपीएस के साथ ऐसा व्यवहार अक्षम्य है. #नहीं_चाहिए_भाजपा pic.twitter.com/o7OG4XRAMy
अखिलेश यादव यांची भाजप सरकारवर टीका
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करत माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या अटकेवरून भाजप सरकारवर टीका केली आहे. भाजप सरकारच्या काळात पोलीस ही पोलिसांविरोधात काम करण्यासाठी विवश आहे. भाजपच्या राजकारणामुळे लोकामध्ये दरी निर्माण होत असल्याचेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-आसाममध्ये डीएनएलएच्या अतिरेक्यांनी पेटवले ट्रक, 5 चालकांचा मृत्यू
पीडितेवर धमकाविण्याचा केला होता ठाकूर यांनी आरोप
घोसी लोकसभेचे प्रतिनिधीत्व करणारे बसपाचे खासदार अतुल राय यांच्याविरोधात पीडितेने बलात्काराची तक्रार दिली होती. त्यानंतर माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांनी पीडिता आणि तिचा मित्र या दोघांवरही 18 डिसेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल केला होता. अमिताभ यांनी पीडिता आणि तिच्या मित्रासह कुटुंबातील सदस्यांबाबत असभ्य टिपण्णी केली होती. पीडिता आणि तिच्या मित्राने धमकी दिल्याचा आरोप माजी आयपीएस अमिताभ ठाकूर यांनी आरोपपत्रात केला होता.
हेही वाचा-नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन हा मूर्खपणाचा निर्णय - पी चिदंबरम