ETV Bharat / bharat

'कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटशिवाय डेल्टा प्लसही चिंताजनक' - आयसीएमआर

'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतो, असा आतापर्यंत कोणताही अहवाल पुढे आलेला नाही. तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभिर्याने घेतले पाहिजे', असे डॉ. रमन आर. गंगाखेडकरांनी म्हटले आहे. दरम्यान, भारतात 50 हून अधिक डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या तीन राज्यात अनेक रुग्ण आढळून आले आहेत.

Raman
Raman
author img

By

Published : Jun 27, 2021, 5:25 PM IST

नवी दिल्ली - 'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत जास्त वेगाने पसरतो, असा आतापर्यंत कोणताही अहवाल पुढे आलेला नाही. तरीही डेल्टा व्हेरिएंटला गांभीर्याने घेतले पाहिजे', असे भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेचे (आयसीएमआर) माजी मुख्य वैज्ञानिक डॉ. रमन आर. गंगाखेडकर यांनी शनिवारी (26 जून) म्हटले.

'कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट हा घातक प्रकार आहे. यामुळे चिंता वाढली आहे. यामुळे रुग्णांमधील संक्रमणीयता वाढते. डेल्टा प्लस फुफ्फुसांच्या पेशींवर आघात करतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी आजाराशी सामना करण्याची क्षमता मंदावते', असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

'डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टापेक्षाही वेगाने पसरत आहे, असा कोणताही अहवाल सध्या तरी उपलब्ध नाही. त्यामुळे डेल्टा प्लस घातक असेल, याबद्दल आपल्याकडे अद्याप तरी पुरावा नाही. पण डेल्टा व्हेरिएंट खूप पसरला आहे. त्यामुळे तो चिंतेचा विषय बनला आहे. मात्र, डेल्टा प्लसलाही गांभिर्याने घेतले पाहिजे', असे गंगाखेडकरांनी म्हटले आहे. 'परंतु आता या म्यूटेशनमध्ये किती कार्यक्षमता आहे आणि आम्ही या विशिष्ट म्यूटेशनचे गुणधर्म जोडू शकतो, हे आम्हालाही अद्याप माहिती नाही', असेही डॉ गंगाखेडकर म्हणाले.

भारतात 50 हून अधिक डेल्टा प्लसचे रुग्ण

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आतापर्यंत 50 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. मध्य प्रदेश, केरळ आणि महाराष्ट्र या तीन राज्यात अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तसेच पंजाब, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि राजस्थानमध्येही डेल्टा प्लस आढळला आहे.

डेल्टा प्लसचा परिणाम

डेल्टा प्लस शरीराच्या इतर अवयवांवर परिणाम करणार आहे का? असा प्रश्न डॉ. गंगाखेडकरांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, की 'डेल्टा प्लसमुळे अवयवांवर परिणाम होतो. डेल्टा प्रकार सेल-टू-सेल ट्रान्सफर होऊ शकतो. हा मेंदुवरही परिणाम करू शकतो. हे कदाचित एखाद्या विशिष्ट पॅथोफिजियोलॉजिकल बदलामुळे आणि वेगवेगळ्या अवयवांवर परिणाम घडवून आणत असल्याचे सिद्ध झाल्यास कदाचित त्या विशिष्ट अवयवांचे नुकसान होईल'.

डेल्टा की डेल्टा प्लस घातक?

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा प्लस अधिक विषाणूयुक्त आहे का? या प्रश्नावर डॉ. गंगाखेडकर म्हणाले, की 'आतापर्यंत आम्हाला माहिती आहे, की डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन श्रेणीबद्ध म्यूटेशन आढळले आहेत. त्यातील L452R हा एक आहे. या विशिष्ट म्यूटेशनमुळे उच्च संक्रमणाची भर पडते. हे अधिक कार्यक्षम आहे. त्यामुळे हा एका व्यक्तीपासून दुसऱ्याकडे लवकर पसरतो'.

तर, "आणखी एक म्यूटेशन दिसून आला आहे. ज्याला P871R म्हणतात. हा सर्वात गंभीर परिवर्तनांपैकी एक आहे. याने शरीरात प्रवेश केल्यास एस 1 आणि एस 2 प्रथिने तयार होतात", असे डॉ. गंगाखेडकरांनी म्हटले.

'साधारणपणे पेशींमध्ये प्रवेश केल्यानंतर हा विषाणू व्यक्तीच्या स्वतःच्या सेल्युलर मशिनरीचा वापर करून अधिक विषाणू तयार करतो, जो मूळ पेशीच्या मृत्यूमुळे फुटतो. त्यामुळे विषाणू मुक्तपणे बाहेर येतो आणि सर्वत्र पसरतो', असेही गंगाखेडकर म्हणाले.

सेल-टू-सेल ट्रान्सफर

डेल्टा प्लस व्हेरिएंटचे स्पष्टीकरण देताना डॉ. गंगाखेडकर म्हणाले, "जेव्हा या प्रकारचा विषाणू दिसतो, तेव्हा तुम्हाला समजेल की या विषाणूंना तटस्थ बनविणारी मोनोक्लोनल अँटीबॉडी दिली तर तुम्हाला ते अधिक कार्यक्षम आढळतील. सामान्यत: मोनोक्लोनल अँटीबॉडी कार्य करते. परंतु येथे या म्यूटेशनमुळे विषाणूच्या संसर्गाची एक अतिरिक्त बाजू आहे. ते संवेदना बनवते, जे जाळ्यासारखे आहे. ते सेलमधून बाहेर न येता एका सेलमधून दुसर्‍या सेलमध्ये जातील. त्याला सेल-टू-सेल ट्रान्सफर म्हणतात".

"सेल-टू-सेल ट्रान्सफर झाल्यास, जरी आपण मोनोक्लोनल अँटीबॉडी दिली, तरीही ते अशा पेशींवर कार्य करू शकणार नाहीत. जिथे व्हायरस सेल-टू-सेलमधून प्रवास करतात. त्यामुळे मोनोक्लोनल अँटीबॉडी काही प्रमाणात कार्यक्षमता गमावण्याची शक्यता आहे", असे डॉ. गंगाखेडकरांनी सांगितले.

हेही वाचा - येत्या सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न - उदय सामंत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.