ETV Bharat / bharat

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश; कोलकात्यात ममता बॅनर्जींची घेतली भेट

गोवा काँग्रेसला मोठा हादरा बसला आहे. माजी मुख्यमंत्री लुईझीन फलेरो यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर थेट तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. पणजीमध्ये तृणमूलचे वातावरण होण्यासाठी जागोजागी फलकदेखील लागल्याचे दिसून आले आहे.

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश

author img

By

Published : Sep 29, 2021, 5:17 PM IST

Updated : Sep 29, 2021, 5:37 PM IST

पणजी- राज्याचे माजी मुख्यमंत्री लुईझीन फलेरो यांनी बुधवारी कोलकात्याला जाऊन तृणमूल पक्षात प्रवेश केला. त्यांच्यासोबत राज्यातील अन्य दहा नेतेही यावेळी तृणमूलमध्ये प्रवेश करणार आहेत. फलेरो यांनी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून नुकताच आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे सुपूर्त केला होता.

गोवा राज्यात इतर पक्षांसोबतच तृणमूलचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. राज्यात यापूर्वीच सत्ताधारी भाजपसह विरोधी पक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी, मगो, गोवा फॉरवर्डसोबत राज्याबाहेरील 'आप'ने निवडणुकीची तयारी सुरू केली. त्यातच बुधवारी तृणमूल काँग्रेसचा समावेश झाला आहे.

तृणमूलचे पणजीमध्ये लागलेले फलक
तृणमूलचे पणजीमध्ये लागलेले फलक

हेही वाचा-Goa Election : निवडणुका ठरलेल्या वेळेतच - मुख्यमंत्री

गोव्याच्या राजकारणात ममतांच्या तृणमूलची सकाळ

जागोजागी तृणमूल पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांची 'गोव्यासाठी गरज', 'ममता बॅनर्जी या गोव्याची नवी सकाळ' या आशयाचे पोस्टर असलेल्या गाड्या राजधानी पणजीत जागोजागी उभ्या आहेत. त्यातच मांडवी नदीच्या पुलावर तृणमूलचे फडकणारे झेंडे सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे गोव्याच्या राजकारणात ममतांच्या तृणमूलची सकाळ उजडायला सुरुवात झाली आहे.

लुईझीन फलेरो यांनी ममता बॅनर्जी यांची घेतली भेट

हेही वाचा-मनोहर पर्रिकरांचा वारसा पुत्र उत्पल चालविणार; आमदार बाबुश मोन्सरातांकडून भाजपला सूचक इशारा

काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळले होते फलेरो-
काँग्रेसमधील गटबाजीला कंटाळून माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. फलेरो यांनी दोनच दिवसांपूर्वी आपण तृणमूलमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले. माजी आमदार फलेरो हे मंगळवारी पक्षप्रवेश करण्यासाठी कलकत्त्याला रवाना झाले होते. त्यांनी बुधवारी आपल्या समर्थकांसह तृणमूलमध्ये पक्षप्रवेश निश्चित केला आहे.

गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांचा दहा नेत्यांसह तृणमूलमध्ये प्रवेश

संबंधित बातमी वाचा-गोवा काँग्रेसमध्ये गटबाजी; आमदारकीचा राजीनामा देत माजी मुख्यमंत्री लुझिनो फलेरो तृणमूलच्या वाटेवर

फलेरो यांच्यासोबत या नेत्यांनी केला तृणमूलमध्ये पक्षप्रवेश

  • लवू मामलेदार- माजी आमदार, महाराष्ट्र गोमंतक पार्टी
  • यतीश नाईक- जनरल सेक्रेटरी, गोवा काँग्रेस कमिटी
  • विजय पै- जनरल सेक्रेटरी - गोवा काँग्रेस
  • मारिओ पिंटो- काँग्रेस कमिटी मेंबर
  • आनंद नाईक- माजी सरपंच तथा काँग्रेस नेते
  • रविंद्रनाथ फलेरो - माजी युवक काँग्रेस अध्यक्ष
  • शिवदास नाईक- लेखक व कवी
  • राजेंद्र काकोडकार- पर्यावरण अभ्यासक
  • अँटोनियो मॉंटेरिओ- अध्यक्ष दक्षिण गोवा वकील संघटना

दरम्यान, गोवा विधानसभेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 नंतर होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Last Updated : Sep 29, 2021, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.