उधमपूर (जम्मू आणि काश्मीर) : जम्मू - काश्मीरमधील उधमपूर जिल्ह्यात शुक्रवारी फूटब्रिज कोसळून सात मुलांसह किमान 24 जण जखमी झाले आहेत. चेनानी ब्लॉकमधील बन गावातील बेनी संगम येथे बैसाखी उत्सवादरम्यान ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू - काश्मीर पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी लगेचच बचावकार्य सुरू केले आहे. घटनेनंतर बेनी एकच खळबळ उडाली आहे.
जखमींची संख्या वाढण्याची शक्यता : अपघातानंतर लगेचच पोलीस आणि स्थानिक स्वयंसेवक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जखमींना वैद्यकीय मदतीसाठी जवळच्या रुग्णालयात हलवले. ढिगाऱ्याखाली आणखी लोक दबले असण्याची शक्यता असल्याने जखमींची संख्या वाढण्याची शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. दरम्यान, उधमपूरचे एसएसपी डॉ. विनोद यांनी सांगितले की, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले.
घराचे छत कोसळून 30 जण जखमी : दुसरीकडे, पूंछ जिल्ह्यातील खिनेटर गावात घराचे छत कोसळल्याने किमान 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी लगेचच पूंछ जिल्ह्याच्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले आहे. हा अपघात जिल्ह्यातील खानितर गावात झाला जेथे स्थानिक लोक झाकीर हुसेन शाह यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी जमले होते. त्यावेळी लोकांच्या गर्दीमुळे घराचे छत कोसळले. त्यामुळे किमान 30 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
पुंछमध्ये मुसळधार पावसाने घर कोसळले : काही दिवसांपूर्वी पुंछमधील डोकडी भागात मुसळधार पावसामुळे एक निवासी घर कोसळले होते. या अपघातात 15 मेंढ्या व शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे खादिम हुसेन यांचे कच्चे घर जमिनीवर कोसळले, परंतु त्यातील रहिवासी चमत्कारिकरित्या बचावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुसळधार पावसामुळे जमीन खचल्याने हे घर कोसळले.
हे ही वाचा : Asad Cars : माफिया अतिकप्रमाणे असदलाही होता महागड्या गाड्यांचा शौक, आता करोडोंची लँड क्रूझर धूळ खात उभी!