ETV Bharat / bharat

Food Poisoning in Jhansi : कार्यक्रमात जेवण खाल्ल्यानं 1000 हून अधिक लोकांना विषबाधा, रुग्णालयात उडाली धावपळ - बडोदा येथील माजी प्रमुख लखनसिंग राजपूत

Food Poisoning in Jhansi : झाशी इथं माजी सरंपचाच्या घरी त्रयोदशीचे भोजन खाल्ल्यानंतर हजारो लोकांची प्रकृती बिघडलीय. काहींना अस्वस्थ वाटले तर काहींना जुलाब आणि उलट्या झाल्या.

Food Poisoning in Jhansi
Food Poisoning in Jhansi
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 10:36 AM IST

झाशी Food Poisoning in Jhansi : जिल्ह्यातील पुंछ पोलीस स्टेशन हद्दीतील बडोदा गावात त्रयोदशीचे जेवण खाल्ल्यानं 1000 हून अधिक लोक आजारी पडल्याची घटना समोर आलीय. यानंतर काही वेळातच परिसरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी झाली होती. तर यात गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णांना ग्वाल्हेरमधील रुग्णालयात पाठवण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच एसडीएम आणि वैद्यकीय अधीक्षक तातडीनं गावात पोहोचले. आजारी लोकांची प्रकृती जाणून घेतल्यानंतर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी डॉक्टरांना दिल्या. या घटनेत कोणीतरी खाद्यपदार्थात भेसळ केली असावी, असा संशय माजी सरपंचानं व्यक्त करुन प्रशासनाकडे चौकशीची मागणी केलीय.

त्रयोदशीच्या कार्यक्रमात लोक पडले आजारी : ग्रामपंचायत बडोदा येथील माजी प्रमुख लखनसिंग राजपूत यांच्या घरी 27 ऑक्टोबर रोजी त्रयोदशीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात परिसरातील सुमारे 2000 लोक आपापल्या कुटुंबासह आले. जेवण घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. मात्र काही काळानंतर, लोकांना अस्वस्थता, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. काही वेळातच माजी प्रधान लखन सिंग राजपूत याच्याइथलं त्रयोदशीचं जेवण चर्चेचा विषय बनलं. अल्पावधीतच कसबा पुंछची सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये आजारी पुरुष, महिला आणि लहान मुलांनी भरून गेली. त्रयोदशीचं जेवण खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडते, असे प्रत्येक रुग्णाच्या ओठावर बोलले जात होते. यात सुमारे 1000 लोक आजारी पडले आहेत.

काही रुग्णांना ग्वाल्हेरला हलविलं : लोकांना त्रास सुरु झाल्यानंतर थोड्याच वेळात पुंछ, समथर आणि जवळपास सर्व हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या वाढली. ज्या रुग्णांची प्रकृती अधिक गंभीर होती त्यांना झाशीच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आलं आणि काही गंभीर रुग्णांना ग्वाल्हेरला पाठवण्यात आलं. रविवारी कसबा पूंछ आणि समथर रुग्णालयातील रुग्णांना रुग्णालयातील सीएचसीमध्ये पाठविण्यात आलं. यावेळी ट्रॉमा सेंटरमध्येही डझनभर रुग्णांची गर्दी जमली होती. रुग्णांना रुग्णवाहिकेतून सतत सीएचसीमध्ये दाखल केलं जात होते.

वैद्यकीय अधीक्षक काय म्हणाले : या घटनेची माहिती मिळताच एसडीएम मनोजकुमार सरोज, सीएचसीचे अधीक्षक माता प्रसाद राजपूत यांनी बडोदा गावात पोहोचून तपासणी केली, रुग्णालय गाठले आणि रुग्णांची स्थिती जाणून घेतली. वैद्यकीय अधीक्षक माता प्रसाद राजपूत यांनी सांगितले की, त्रयोदशीला अन्न खाल्ल्यानंतर लोकांना विषबाधा झाल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाभरातील विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसंच सीएचसीमध्ये दाखल असलेल्या रुग्णांवर डॉक्टरांनी उपचार सुरू केले.

हेही वाचा :

  1. Food Poisoning To Students: शासकीय वसतीगृहातील विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; सहा विद्यार्थिनीची प्रकृती चिंताजनक
  2. Negligence Food Poisoning : अन्नातून विषबाधा झाल्यास उपचाराकडे दुर्लक्ष करणे ठरू शकते घातक
  3. Food Poisoning News: आश्रम शाळेतील 170 मुलांना जेवणातून विषबाधा, 24 तासांत अहवाल देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.