नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत हिवाळ्यामुळे रोज सकाळी दाट धुके पडत असून हवेचा स्तरही ढासळला आहे. आज सकाळी जहांगीर पुरी, आनंद विहार सह इतर भागात धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यातून वाहनांना वाट काढावी लागत असल्याने अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.
किमान तापमान १० अंशावर -
हवामान विभागानुसार दिल्लीतील किमान तापमान १० अंशाच्या आसपास राहणार आहे. हवेचा स्तर ३०९ अंकापर्यंत आला असून ही हवा अती खराब गटात मोडते. थंडीमुळे रस्त्यांवर सकाळच्या वेळी तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे. बेघर व्यक्तींसाठी दिल्ली सरकारने निवार गृहांची निर्मिती केली असून तेथे राहण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझर अनिवार्य केले आहे. निवारा गृहातील कोणी आजारी पडले तर त्याला मोहल्ला क्लिनिकमध्ये पाठवण्यात येते, असे निवारागृहात काम करणाऱ्या अनिकेत या तरुणाने सांगितले.