ETV Bharat / bharat

FlyDubai Aircraft Lands Safely : फ्लाय दुबई विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड, विमानाला सुरक्षित उतरवण्यात वैमानिकांना यश - उड्डाण

फ्लाय दुबई कंपनीच्या काठमांडूवरुन दुबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र या विमानाला दुबईतील विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात यश आले आहे.

FlyDubai Aircraft Lands Safely
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Apr 25, 2023, 9:01 AM IST

काठमांडू : फ्लाय दुबई विमानसेवेच्या विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने खळबळ उडाली होती. मात्र या विमानाला दुबई विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात वैमानिकांना यश आले. काठमांडू विमानतळावरुन या विमानाने दुबईला 160 प्रवाशांसह उड्डाण केले होते. मात्र काठमांडू विमानतळावरुन सोमवारी सकाळी 09.20 ला उड्डाण केल्यानंतर विमानात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने काठमांडू विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती.

विमान आकाशात घालत होते घिरट्या : सोमवारी सकाळी 09.20 वाजता फ्लाय दुबई कंपनीच्या विमानाने काठमांडू विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. त्यामुळे विमान धारके येथील आकाशात काही काळ घिरट्या घालत होते. वैमानिकांनी नंतर कंट्रोल रुमला विमानातील तांत्रिक बिघाड दूर झाल्याचे समजल्यानंतर उड्डाण सुरू ठेवणार असल्याचे सांगितले. त्यानंतर विमान दुबईत सुरक्षितपणे उतरल्याची माहिती नेपाळमधील सरकारी माध्यमांनी मंगळवारी दिली. नागरी उड्डाण मंत्री सुदान किराती यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरही याबाबतची माहिती शेअर केली आहे. फ्लाय दुबई विमान आपल्या दुबईतील विमानतळाकडे सुरक्षितपणे उड्डाण करत आहे. त्यामुळे कोणीही काळजी करू नये असे आवाहनही मंत्री सुदान किराती यांनी केले होते.

काठमांडूच्या आकाशात विमानाला आग : दुबईवरुन नेपाळच्या काढमांडूला विमानसेवा सुरू आहे. सोमवारी सकाळी यातील फ्लाय दुबई विमानाच्या बोईंग 576 क्रमांकाच्या काठमांडू ते दुबई या विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमानिकांच्या लक्षात आले. या विमानात 50 नेपाळी प्रवाशांसह 160 पेक्षा जास्त प्रवाशी होते. मात्र प्रत्यक्षदर्शींनी काठमांडूच्या आकाशात विमानाला आग लागल्याचे पाहिल्याचा दावा केला होता. त्यामुळे काठमांडू विमानतळावर अग्निशमन दलालाही सतर्क ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र त्यानंतर फ्लाय दुबई कंपनीचे विमान सुरक्षितपणे दुबईकडे उड्डाण करत असल्याची माहिती नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सोमवारी एका ट्विटमध्ये दिली होती.

विमान अपघातात 72 नागरिकांनी गमावला होता जीव : या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला नेपाळमधील नव्याने उघडलेल्या विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात विमान दरीत कोसळले होते. या विमानातील सर्व 72 नागरिकांचा मृत्यू झाल्याने नेपाळमध्ये मोठी विमान वाहतूक दुर्घटना घडली. लँडिंगच्या वेळी दोन्ही इंजिनच्या प्रोपेलरमध्ये बिघाड झाल्यामुळे हा अपघात झाला. येती एअरलाइन्सचे एटीआर-72 विमान काठमांडूहून पोखराकडे जात असताना 15 जानेवारीला सकाळी अपघात झाला होता. या अपघातात विमानात पाच भारतीयांसह ७२ जणांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - YS Sharmila Send To Jail : पोलिसांना मारहाण करणे भोवले! वाय एस शर्मीला यांना 14 दिवसांची कोठडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.