ETV Bharat / bharat

Flood Situation In Ahmedabad: जोरदार पावसामुळे अहमदाबादमध्ये पूरसंकट; पंतप्रधानांचे स्थितीवर लक्ष - Heavy Rain In Ahmedabad

सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Heavy Rain In Ahmedabad ) अहमदाबादमध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तसेच, अनेक ठिकाणी पुरसदृष्य स्थिती आहे.

जोरदार पासवामुळे अहमदाबादमध्ये पूरसंकट
जोरदार पासवामुळे अहमदाबादमध्ये पूरसंकट
author img

By

Published : Jul 12, 2022, 6:02 PM IST

Updated : Jul 13, 2022, 6:47 AM IST

अहमदाबाद (गुजरात) - गुजरातमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. सोमवार (दि. 12 जुलै)रोजी अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे, त्यामुळे सध्या पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ( Flood Crisis In Ahmedabad ) त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनीर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना फोट करून परिस्थितीचा आढावाही घेतला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस संपूर्ण राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर, दक्षिण गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छमधील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे.

सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन - "गुजरातमधील विविध भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरसदृश परिस्थितीच्या संदर्भात, मी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याशी बोललो आहे. ( Floods in Ahmedabad due to heavy rains ) तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांना दिले आहे अस ट्विट शहा यांनी केल आहे. गुजरात प्रशासन, राज्य आपत्ती प्रतिसाद दल आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) बाधित लोकांना त्वरित मदत पुरवण्यात गुंतले आहेत, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले आहे.

मोदींचा दूरध्वनीवरून संपर्क - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना राज्यातील पुरामुळे बाधित झालेल्या लोकांचे हाल कमी करण्यासाठी केंद्राकडून परिस्थिती हाताळण्यासाठी एनडीआरएफसह सर्व आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. गुजरातचे मुख्यमंत्र्यांना राज्यातील परिस्थितीची माहिती घेण्यासाठी मोदींनी दूरध्वनीवरून संभाषण केले.

लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात - गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी पंतप्रधानांना गेल्या 48 तासांत संपूर्ण राज्यात, विशेषत: दक्षिण आणि मध्य गुजरात भागात झालेल्या मुसळधार पावसाची आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली. गुजरातमधील अनेक गावांचा संपर्क तुटला असून, अधिकाऱ्यांनी लोकांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर तैनात करण्यास सांगितले आहे. पुरामुळे आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, एनडीआरएफची टीम लोकांना वाचवण्याचे काम करत आहे. सध्या विविध भागातून 2000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

जुलैमध्ये एका दिवसात गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम - हवामान खात्याने म्हटले आहे की, गुजरातची परिस्थिती अचानक आलेल्या पुरामुळे अशी झाली आहे. राज्यात अवघ्या चार तासांत 18 मिलीमिटर पाऊस झाला आहे. लोक आता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी धडपडत आहेत. गुजरातची राजधानी अहमदाबादमध्ये रविवारी अवघ्या तीन तासांत ११५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जुलैमध्ये एका दिवसात गेल्या पाच वर्षांतील सर्वोच्च विक्रम नोंदवला गेला आहे.

हेही वाचा - Mohammed Zubair: मोहम्मद जुबेरच्या अंतरिम जामीनाला सुप्रीम कोर्टाकडून पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ

Last Updated : Jul 13, 2022, 6:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.