पाकिस्तानात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आले असून पूरस्थिती गंभीर झाली आहे. या पुरात मृतांची संख्या 1 हजाराहून अधिक झाली आहे. याशिवाय हजारावर नागरिक जखमी झाले आहेत. परिस्थिती प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्यासारखी झाली आहे.
पाकिस्तानमध्ये पूरस्थितीवर नियंत्रण मिळविणे प्रशासनाला कठीण झाले आहे. आतापर्यंत 1033 नागरिक या पुरात मृत्युमुखी पडले आहेत. तर 1527 नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या 24 तासातच 119 नागरिकांचा पुरामुळे मृत्यू झाला आहे, 79 नागरिक जखमी झाले आहेत. एकूण 9,49,858 घरे या पुरात उद्ध्वस्त झाली आहेत.
हेही वाचा ATM Washed Away नदीला आला पूर, २४ लाख रुपयांसह एटीएम गेले पुराच्या पाण्यात वाहून, पहा व्हिडीओ