ETV Bharat / bharat

Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाल्याने जनजीवन विस्कळीत, लाखो नागरिकांना पुराचा फटका

author img

By

Published : Jun 22, 2023, 12:35 PM IST

आसाममध्ये पूरस्थितीमुळे नागरिकांना चांगलाच फटका बसला आहे. पुराच्या फटक्यामुळे तब्बल 1.2 लाख नागरिक बाधित झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने आसाममध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Assam Flood
आसाममध्ये पूरस्थिती गंभीर

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थिती गंभीर झाली असून गुरुवारीही संततधार पावसामुळे अनेक परिसर जलमय झाला आहे. तब्बल 1.2 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. आसामधील 10 जिल्ह्यांमध्ये सुमारे 1.2 लाख नागरिकांना पुराचा फटका बसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून येत्या काही दिवसात आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

या जिल्ह्यातील नागरिकांना बसला फटका : गुवाहाटी येथील भारतीय हवामान विभागाच्या IMD च्या प्रादेशिक हवामान केंद्राने (RMC) बुधवारपासून 24 तासांसाठी अलर्ट जारी केला आहे. त्यानंतर गुरुवार आणि शुक्रवारसाठी 'यलो' अलर्ट जारी करण्यात आला आहे. 'ऑरेंज' अलर्ट म्हणजे आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार राहणे आणि 'यलो' अलर्ट म्हणजे लक्ष ठेवून अपडेट राहणे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) अहवालानुसार बाक्सा, बारपेटा, दररंग, धेमाजी, धुबरी, कोक्राझार, लखीमपूर, नलबारी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांमध्ये 1 लाख 19 हजार 800 हून अधिक नागरिक पुरामुळे प्रभावित झाले आहेत.

नलबारी जिल्ह्याला बसला सर्वात जास्त फटका : नलबारी जिल्ह्याला सर्वात जास्त फटका बसला आहे. येथे सुमारे 45 हजार नागरिक त्रस्त आहेत. त्यानंतर बक्सा 26 हजार 500 पेक्षा जास्त आणि लखीमपूर 25 हजार पेक्षा जास्त आहेत. प्रशासन पाच जिल्ह्यांमध्ये 14 मदत शिबिरे चालवत आहे. तिथे 2 हजार 091 नागरिकांनी आश्रय घेतला आहे. पाच जिल्ह्यांमध्ये 17 मदत वितरण केंद्रे चालवण्यात येत आहेत. लष्कर, निमलष्करी दल, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, SDRF, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा (F&ES), नागरी प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून 1 हजार 280 नागरिकांना वाचवले आहे.

आसाममधील 780 गावे पाण्याखाली : सध्या आसाममधील 780 गावे पाण्याखाली असल्याची माहिती ASDMA च्या अहवालावरुन स्पष्ट झाले आहे. आसाममध्ये 10, 591.85 हेक्टर पीक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. बक्सा, बारपेटा, सोनितपूर, धुबरी, दिब्रुगड, कामरूप, कोक्राझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, दक्षिण सलमारा आणि उदलगुरी येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. दिमा हासाओ आणि कामरूप महानगरात मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी धोक्याच्या पातळीवर : बाक्सा, नलबारी, बारपेटा, सोनितपूर, बोनगाईगाव, दररंग, चिरांग, धुबरी, गोलपारा, कामरूप, कोक्राझार, लखीमपूर, नागाव, उदलगुरी, धेमाजी आणि माजुली या भागात पुराच्या पाण्यामुळे बंधारे, रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. बारपेटा, दररंग, कामरूप महानगर, कोक्राझार आणि नलबारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी शहरी भाग पाण्याखाली गेला. ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी बेकी तीन ठिकाणी धोक्याच्या पातलीवर वाहत असल्याचेही ASDMA च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. Kolhapur Flood : संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज
  2. Rajasthan Flood Situation : बिपरजॉय चक्रीवादळाचा राजस्थानमध्ये कहर, अनेक भागात पूरसदृश परिस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.