गुजरात : पोलिसातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गोवा एटीसीला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटला ( Flight From Moscow To Goa ) गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. सध्या विमानाची तपासणी करण्यात येत आहे. जामनगर विमानतळावर ( Jamnagar Airport ) एका रशियन दूतावासाने अधिकाऱ्यांना ही महिती दिली. मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व 244 प्रवाशांना उतरवण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. सोमवारी रात्री 9.45 वाजता फ्लाईटचे विमानतळावर लँडिंग करण्यात आले. घटनास्थालवर स्थानिक पोलिसांसह रुग्णवाहिका आणि बॉब्मशोधक पथक दाखले झाले आहे. सर्व विमानाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ( Flight From Moscow To Goa Makes Emergency landing )
धमकीनंतर विमानाचं एमर्जन्सी लँडिंग : ( Emergency landing ) मॉस्कोवरुन गोव्याला येणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती गोवा एटीसीला मिळाली होती. त्यानंतर विमान गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आले. विमानाच् एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये मॉस्कोवरुन 400 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर दिल्ली विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग ( Emergency landing In Jamnagar ) करण्यात आले होते. CISF ला फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. आज मॉस्कोवरुन गोव्याला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची महिती मिळाली आहे. विमानाला जामनगरमध्ये एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सर्व प्रवाशी सुखरुप ( All passengers safe ) असून विमानाची कसून चौकशी करण्यात येत आहे. ( Emergency landing In Jamnagar Gujarat )
दूतावासाला सतर्क करण्यात आले : ( The Embassy was Alerted ) विमानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मॉस्कोहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या विमानात बॉम्ब असल्याची माहिती रशियन दूतावासाने भारतीय अधिकाऱ्यांनी दिली होती. जामनगर भारतीय हवाई दलाच्या तळावर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानावरील सर्वजण सुरक्षित आहेत.तसेच गोवा एटीसीला मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्बची माहिती मिळाल्यानंतर गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर ( Goa International Airport ) सुरक्षा कडक करण्यात आली. चार्टर्ड फ्लाइट गुजरातमधील जामनगरला वळवण्यात आली आहे. विमान आयसोलेशन बेमध्ये असून पुढील तपास सुरू आहे. जामनगर विमानतळावर बॉम्ब शोधक पथक आणि एटीएस दाखल झाले असून विमान आयसोलेशन बेमध्ये आहे आणि पुढील तपास सुरू आहे. मॉस्को-गोवा चार्टर्ड फ्लाइटमधील सर्व 244 प्रवाशांना रात्री 9.49 च्या सुमारास सुरक्षितपणे विमानतळावर उतरवण्यात आले, असे जामनगर विमानतळ संचालकांनी सांगितले.