सत्यसाई ( आंध्रप्रदेश ) : सत्य साई जिल्ह्यात ( Satya Sai District Andhra Pradesh ) विजेच्या तारा गाडीवर पडल्याने ( Electric wires fell on the Vehicle ) पाच जणांचा होरपळून मृत्यू ( Five people were burnt to death ) झाला. आंध्र प्रदेशातील सत्यसाई जिल्ह्यातील चिल्लाकोंडेयपल्ली, तादिमरी मंडल येथे एका गाडीचा थेट विद्युत तारेशी संपर्क आल्याने पाच जण जिवंत जाळले गेले. लोक शेतीच्या कामासाठी जात असताना ही घटना घडली. हे सर्वजण गुड्डमपल्ली येथून चिल्लकोंडयापल्ली येथे जात होते.
आंध्र प्रदेशातील श्रीसत्यसाई जिल्ह्यातील चिल्लाकोंडैयापल्ली, ताडीमरी मंडल येथे एक भीषण अपघात झाला. ज्या गाडीमध्ये मजूर शेतीच्या कामासाठी जात होते, त्यावर हाय टेंशनच्या विद्युत तारा तुटल्या. गुडमपल्लीहून चिल्लाकोंडैयापल्लीकडे जात असताना गाडीला आग लागली आणि पाच जण जागीच जिवंत जळाले. या घटनेत ऑटोचालक पोतुलय्या बचावला, मात्र लक्ष्मी नावाची महिला गंभीर जखमी झाली. तिला बट्टलपल्ली आरटीडी रुग्णालयात हलवण्यात आले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत.
हे लक्षात येताच स्थानिक लोक धावत आले परंतु डोळ्यासमोर जळणाऱ्या लोकांना वाचवता आले नाही. तातडीने रुग्णवाहिकेला कळवले तरी त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मृतदेह पूर्णपणे जळाल्याने मजुरांची ओळख पटवणे कठीण झाल्याचे त्यांनी सांगितले. बट्टाई या बागेतील झाडांची तण काढण्यासाठी जात असताना ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा : Rudraprayag Accident : अहमदनगरमधील भाविकांच्या गाडीचा रुद्रप्रयागमध्ये अपघात.. महिलेचा मृत्यू.. १० जण जखमी