मधेपुरा (बिहार) : बिहारमधील मधेपुरामध्ये आज सकाळी एका ऑटोचा भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना चौसा पोलिस स्टेशन हद्दीतील कलसन - चौसा स्टेट हायवे 58 वरील घोशाई गोठ गावाजवळ घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी ऑटोतून गंगेत स्नान करण्यासाठी निघालेल्या लोकांना अज्ञात वाहनाने समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, ऑटोमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
उपचारादरम्यान एकाचा मृत्यू : अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक लोकांनी तातडीने सर्व जखमींना उचलून चौसा सामुदायिक आरोग्य केंद्रात आणले. जेथे अन्य एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत या घटनेतील मृतांचा आकडा 5 वर पोहचला आहे तर इतर 4 गंभीर जखमी उपचारासाठी दवाखान्यात दाखल आहेत. या घटनेची माहिती सर्व जखमींच्या नातेवाईकांना देण्यात आली आहे.
पोलिसांचा तपास सुरु : या अपघातातील सर्व मृत सहरसा जिल्ह्यातील दुर्गापूर भड्डी गावचे रहिवासी आहेत. घरातील सर्व लोक भागलपूर जिल्ह्यातील महादेवपूर घाटावर गंगेत स्नान करण्यासाठी जात होते. त्याच दरम्यान हे सर्वजण या वेदनादायक अपघाताचे बळी ठरले. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी मधेपुरा येथील सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.
समृद्धी महामार्गावर अपघात : महाराष्ट्रातील महत्त्वकांक्षी समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. काल बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजाजवळ एक अर्टिका गाडी उलटून भीषण अपघात झाला. या अपघातात 2 मुले आणि 4 महिला ठार झाल्या असून 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वेगात असलेली ही कार उलटल्यामुळे हा अपघात झाला आहे. ही कार औरंगाबादहून समृद्धी महामार्गे शेगावला जात होती.
हेही वाचा : Samruddhi Mahamarg Accident: सिंदखेड राजाजवळ अर्टिका गाडीचा भीषण अपघात, 2 मुले 4 महीला ठार; 6 गंभीर जखमी