ETV Bharat / bharat

पाच नक्षलवाद्यांना छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातून अटक - chhattisgarh naxal news

अटक केलेले नक्षलवादी जिल्ह्यातील कसाराम ओढ्याजवळील आयईडी स्फोटातही सहभागी होते. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा युनिटच्या अधिकाऱ्याचा यात मृत्यू झाला होता.

naxals
naxals
author img

By

Published : Dec 26, 2020, 8:59 PM IST

Updated : Dec 26, 2020, 9:19 PM IST

रायपूर - छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात सुरक्षादलांना लक्ष्य करण्यासाठी आयईडी लावण्यात आल्याचा आरोप असलेल्या पाच नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेले नक्षलवादी जिल्ह्यातील कसाराम ओढ्याजवळील आयईडी स्फोटातही सहभागी होते. या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा युनिटच्या अधिकाऱ्याचा यात मृत्यू झाला होता.

दोन ठिकाणाहून अटक

शुक्रवारी किस्ताराम पोलीस ठाण्यात दोन ठिकाणाहून या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तेथे सुरक्षा दलाचे संयुक्त पथक कारवाईसाठी निघाले होते, अशी माहिती सुकमाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनील शर्मा यांनी दिली. या कारवाईत सीआरपीएफ, त्यांचे एलिट युनिट कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रेझोल्यूशन अ‌ॅक्शन), जिल्हा राखीव पथक (डीआरजी) आणि स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)चे कर्मचारी सहभागी झाले होते, असे ते म्हणाले.

गस्तीपथकाचा जंगलाला वेढा

राजधानी रायपूरपासून ४५० कि. मी. अंतरावर असलेल्या कासारम गावाजवळ गस्तीपथक जंगलाला वेढा घालून बसले होते, तेव्हा तीन संशयितांनी त्यांना जखमी केले. चौकशीदरम्यान त्यांनी बंदी असलेल्या भाकपा (माओवादी) यांच्या संगतीची कबुली दिली आणि त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे जवळच्या टिंगनपल्ली जंगलात आणखी दोघांना पकडले गेले, असे अधिकाऱ्याने सांगितले. अटक करण्यात आलेले कार्यकर्ते मडवी दुधवा (२०), माडवी गंगा (वय 24), कोराम लच्छू (२०), सोधी गंगा (40) आणि मादवी देवा (35) हे माओवादी म्हणून कार्यरत होते.

Last Updated : Dec 26, 2020, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.