पाटना - बांका जिल्ह्यातील रजौन गावातील राजावर गावात सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच मुलांचा मृत्यू झाला ( five children death in Cylinder Blast ) आहे.
रजौन गावातील अशोक पासवान यांच्या घरात सिलिंडर असलेल्या खोलीत मुले खेळत होती. त्या सिलिंडरमधून बराच वेळ गॅस गळती सुरू होती. स्वयंपाक करण्यासाठी प्रकाश पासवान यांची पत्नी सीता देवी यांनी काडी पेटविल्यानंतर संपूर्ण घरात आग ( banka cylinder blast ) पसरली. आग पाहताच त्यांनी कसेबसे स्वत:चे प्राण वाचविले. मात्र, आगीत जळून मुलांचा मृत्यू ( childrens Death due to cylinder blast ) झाला. घटनेची माहिती मिळताच बांकाचे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक पोहोचले.
हेही वाचा-Year Ender 2021: 2021 मधील 'या' 21 महत्त्वाच्या घटना राहणार संस्मरणीय
गॅस सिलिंडरचा स्फोट होताच परिसरात मोठा गोंधळ
गॅस सिलिंडरचा स्फोट होताच ( Bihar gas cylinder blast ) परिसरात मोठा गोंधळ उडाला. घटनेत सीता देवी जखमी झाल्या आहेत. मुले आगीत एवढी गंभीररित्या भाजली होती की रुग्णालयात जाईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. मृतामध्ये अशोक पासवान यांचा मुलगा अंकुश कुमार (12 वर्ष), अंशु कुमारी (8 वर्ष), सीमा कुमारी ( 4 वर्षे ), शिवानी कुमारी ( 6 वर्षे ) आणि सोनी कुमारी ( 3 वर्षे ) यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा दंडादिकारी सुहर्ष भगत आणि जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद कुमार गुप्ता पोहोचले. मुलांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गॅस सिलिंडरच्या स्फोटात मुंबईत बाप-लेकाचा मृत्यू
वरळी बीडीडी चाळ ( BDD Chawl Worli ) येथे 30 नोव्हेंबरला सिलिंडर ( Worli Gas Cylinder Blast ) स्फोट झाला. या स्फोटात एकाच घरातील चार जण जखमी झाले होते. त्यापैकी एका लहान बालकाचा मृत्यू झाला. त्यानंतर 4 डिसेंबरला या बालकाच्या वाडिलाचाही नायर रुग्णालयात मृत्यू झाला.