उदयपूर (राजस्थान) - उदयपूरमध्ये ओमायक्रॉनने संक्रमित झालेल्या 73 वर्षीय वयोवृद्धाचा मृत्यू 31 डिसेंबर रोजी झाला होता. त्यांचा 25 डिसेंबर रोजी ओमायक्रॉन पॉझिटिव्ह अहवाल आला होता. रॉयटर्स या संस्थेने हा भारतातील पहिला मृत्यू असल्याचे म्हटले आहे. तर तांत्रिकदृष्ट्या हा मृत्यू ओमायक्रॉनशी संबंधित असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले आहे.
-
Technically it is #Omicron related death (on the Rajasthan case). He was an elderly person. The person is reported to have comorbidities, like diabetes among others: Luv Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/i6SXECwp8e
— ANI (@ANI) January 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Technically it is #Omicron related death (on the Rajasthan case). He was an elderly person. The person is reported to have comorbidities, like diabetes among others: Luv Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/i6SXECwp8e
— ANI (@ANI) January 5, 2022Technically it is #Omicron related death (on the Rajasthan case). He was an elderly person. The person is reported to have comorbidities, like diabetes among others: Luv Aggarwal, Joint Secretary, Union Health Ministry pic.twitter.com/i6SXECwp8e
— ANI (@ANI) January 5, 2022
दोन वेळा कोरोना निगेटिव्ह -
राजस्थानातील उदयपूरमध्ये दोन वेळा चाचण्याकरून कोरोना निगेटिव्ह आलेल्या वृद्धाचा ओमायक्रॉनने मृत्यू ( Omicron in India ) झाला होता. त्यांना विविध आजार होते. त्यांना पोस्ट कोविड निमोनिया ( Death Due To Post Covid Ailment ) झालेला होता त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे होते.
25 डिसेंबरला ओमायक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह -
मृत्यू झालेल्या वृद्धाला हाइपोथॉयरोडिज्म देखील झालेला होता. 21 डिसेंबर आणि 22 डिंसेबर रोजी केलेल्या त्यांच्या दोन्ही कोरोना चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र 25 डिसेंबर रोजी त्यांचा ओमायक्रॉन रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला होता. तज्ज्ञांच्या मते, व्हायसरचा परिणाम हा 10 दिवस राहतो. हाय रिक्स रुग्णांसाठी तो अत्यंत धोकादायक असतो. मृत रुग्णाला डायबिटीज, हाइपरटेंशन आणि हाइपोथॉइरॉडिज्म आदी आजार होते.