ETV Bharat / bharat

First Monkey Pox Case In India : केरळमध्ये आढळला देशातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण; संपर्कातील 11 जण विलगीकरणात

कोल्लमचा मूळ रहिवासी जो UAE मधून आला होता आणि रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला मंकी पॉक्सचे निदान झाले ( Monkey Pox Case ) आहे. असे आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. रुग्णाकडून गोळा केलेले नमुने पुण्याच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आज (गुरुवारी) आलेल्या निकालात ते मंकी पॉक्ससाठी पॉझिटिव्ह असल्याची पुष्टी झाली. ( First Monkey Pox Case In India )

author img

By

Published : Jul 14, 2022, 8:57 PM IST

Updated : Jul 15, 2022, 12:48 PM IST

First Monkey Pox Case In India
देशातील पहिला मंकी पॉक्सचा रुग्ण

तिरुअनंतपुरम (केरळ) : UAE मधून आलेल्या एका व्यक्तीला मंकी पॉक्सची लागण असल्याचे निदर्शनात आले ( First Monkey Pox Case In India ) आहे. अशी माहिती ही केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली आहे. कोल्लमचा मूळ रहिवासी जो UAE मधून आला होता आणि रुग्णालयात दाखल झाला होता. तो पहिला मंकी पॉक्स झालेला रुग्ण आहे, असे मंत्री वीणा जॉर्ज म्हणाले आहे. रुग्णाकडून गोळा केलेले नमुने पुण्याच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. आज (गुरुवारी) आलेल्या निकालात त्यांची मंकी पॉक्स चाचणी पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल - मंकी पॉक्सची लक्षणे आढळलेला पुरुष हा 35 वर्षीय आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याचे नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यांला प्रथम कोल्लम येथील खाजगी रुग्णालयात आणि नंतर तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

11 जण विलगीकरणात - या व्यक्तीच्या संपर्कातील 11 जणांना याची माहिती देण्यात आली असून 11 जणांना विलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. त्यात विमानतळावरून कोल्लमला नेणाऱ्या टॅक्सी चालकाचा ही समावेश आहे. असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

देशातील मंकी पॉक्सची ही पहिलीच घटना असल्याचे सांगत मंत्री म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. परिस्थिती नियंत्रणात आहे. मंकी पॉक्स हा स्मॉल पॉक्स सारखीच लक्षणे असलेला आजार आहे. तथापि, मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे आणि रोगासाठी लसीकरण उपलब्ध आहे.

सर्व राज्यांना खबरदारीचे केंद्राचे निर्देष - जगभरातील मांकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे केंद्र सरकारने राज्यांना खबरदारी बाळगण्यास सांगितले आहे. संशयित ठिकाणांवरुन देशातील प्रवेशाच्या सर्व ठिकाणी संशयित प्रकरणांची तपासणी आणि चाचणी घेण्यास सांगितले. केंद्राने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मंकीपॉक्सची कोणतीही संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्याचे आदेशही संबंधित रुग्णालयांना द्यावेत असे स्पष्ट केले आहे.

असा विषाणूचा प्रसार होतो :

• मंकी पॉक्स हा प्राण्यापासून मानवांमध्ये तसेच मानवाकडून मानवामध्ये प्रसारित होऊ शकतो. हा विषाणू तुटलेली त्वचा (जरी दिसत नसला तरीही), श्वसनमार्गातून किंवा श्लेष्मल पडद्याद्वारे (डोळे, नाक किंवा तोंड) शरीरात प्रवेश करतो.
● चाव्याव्दारे किंवा ओरखडे, बुशमीट तयार करणे (बुशमीट हे वन्यजीव प्रजातींचे मांस आहे), शरीरातील द्रव किंवा घावाशी थेट संपर्क, किंवा दूषित बिछान्याद्वारे घावाशी अप्रत्यक्ष संपर्क यामुळे प्राण्यांपासून मनुष्यात संक्रमण होऊ शकतो. मानव-ते-मानव संक्रमण प्रामुख्याने मोठ्या श्वासोच्छवासाच्या थेंबांद्वारे होते, असे मानले जाते.
● हे शरीरातील द्रव किंवा घाव सामग्रीच्या थेट संपर्काद्वारे आणि घाव सामग्रीच्या अप्रत्यक्ष संपर्काद्वारेदेखील प्रसारित केले जाऊ शकते, जसे की संक्रमित व्यक्तीचे दूषित कपडे किंवा लिनेनद्वारे.
• मंकी पॉक्सचे क्लिनिकल सादरीकरण स्मॉलपॉक्ससारखे आहे. एक संबंधित ऑर्थोपॉक्स वायरल संसर्ग ज्याला 1980 मध्ये जगभरातून निर्मूलन घोषित करण्यात आले होते. मंकी पॉक्स चेचकपेक्षा कमी सांसर्गिक आहे आणि कमी गंभीर आजार कारणीभूत आहे.
• उष्मायन काळ सामान्यतः 7-14 दिवसांचा असतो. परंतु, 5-21 दिवसांपर्यंत असू शकतो आणि या कालावधीत व्यक्ती सहसा संसर्गजन्य नसते.

• पुरळ दिसण्याच्या 1-2 दिवस आधी संक्रमित व्यक्ती हा रोग प्रसारित करू शकतो आणि सर्व खरुज गळून पडेपर्यंत संसर्गजन्य राहू शकतो.

हेही वाचा - सावत्र आई बनली वैरीणी, जेवायला मागितले म्हणून 6 वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगात टाकले उकळते तेल

Last Updated : Jul 15, 2022, 12:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.