ETV Bharat / bharat

अहमदाबादमधील 13 वर्षीय मुलाला ‘म्युकरमायकोसिस’ ची लागण - Gujarat Mucormycosis update

गुजरातमध्ये म्युकरमायकोसिसची लागण एका 13 वर्षीय मुलाला झाली आहे. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित मुलाला यापूर्वी कोरोना झाला होता. दरम्यान त्यांच्या आईचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुलाला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.

म्युकोरमायकोसिस
म्युकोरमायकोसिस
author img

By

Published : May 21, 2021, 4:50 PM IST

Updated : May 21, 2021, 5:10 PM IST

अहमदाबाद - देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरुद्घ युद्ध सुरू असतानाच ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनामुक्त झाल्यावर ‘म्युकरमायकोसिस’ या आजाराचा सामना रुग्णाला करावा लागत आहे. गुजरातमध्ये म्युकोरमायकोसिसची लागण एका 13 वर्षीय मुलाला झाली आहे.

अहमदाबादमधील एका 13 वर्षीय मुलाला म्युकरमायकोसिसची लागण झाली आहे. मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधित मुलाला यापूर्वी कोरोना झाला होता. दरम्यान त्यांच्या आईचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुलाला म्युकरमायकोसिसची लागण झाल्याने कुटुंबामध्ये भीतीचे वातावरण आहे.

लवकर उपचार झाले तर हा आजार बरा होतो -

कोरोनानंतर मधुमेह असणाऱ्यांना या आजाराची लागण होते. यात नाकात व डोळ्यांमध्ये बुरशी तयार होऊन डोळे लाल होतात. सुरुवातीच्या काळात यावर उपचार झाले तर हा आजार बरा होतो. परंतु, दुर्लक्ष केल्यास या आजाराची गंभीरता वाढत जाऊन ही बुरशी मेंदूपर्यंत पोहोचते व रुग्णाची परिस्थिती गंभीर होत जाते. त्यामुळे कोरोनानंतर डोळे व नाकासंबंधी काही तक्रारी आढळल्यास तात्काळ संबंधित तज्ज्ञांना दाखवणे गरजेचे आहे.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय?

म्युकरमायकोसिस हा एक जंतूसंसर्ग आहे. हा बुरशीजन्य आजार आहे. हा आजार जुना असून आता मधुमेह असलेल्या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये हा आजार आता बळावत आहे. कोरोनामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. अशात नाक आणि सायनसमध्ये जंतूसंसर्ग वाढतो. नाक आणि सायनसची त्वचा खराब होऊन संसर्ग आणखी वाढतो. मग सायनसपासून तो डोळ्यांकडे पुढे मेंदूकडे जातो. यादरम्यान नाकात दुखणे, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे अशी लक्षणे सुरू होतात. ही लक्षणे असल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांकडे धाव घेत उपचार घेणे आवश्यक असल्याचे डॉ. केवळे यांनी सांगितले आहे.

म्युकरमायकोसिस आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ -

म्युकरमायकोसिस हा आजार जुना आहे खरा. या आजराचे रुग्ण खूपच कमी अगदी नगण्य असतात. पण कोरोना काळात मात्र आता या आजाराच्या रुग्णांची संख्या मुंबई-महाराष्ट्रासह अनेक राज्यात वाढू लागली आहे. महाराष्ट्रात असे अनेक रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे पोस्ट कोविड उपचार घेताना या लक्षणांवरही बारीक लक्ष ठेवत त्यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून घेणे आता आवश्यक झाले आहे.

Last Updated : May 21, 2021, 5:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.