फिरोजाबाद: फिरोजाबादमध्ये ऑनर किलिंगचे प्रकरण समोर आले आहे. येथे बांगडी कारखान्यात काम करणाऱ्या मजुराने मुलीचा गळा चिरून हत्या केली आहे (Firozabad honor killing). प्रथमदर्शनी हे ऑनर किलिंगचे प्रकरण आहे असे दिसते. कारण खुद्द वडिलांनीच सर्व काही मान्य करताना खुनामागील कारण सांगितले आहे. पोलिस तपासानंतर याची अधिक माहिती बाहेर येईल.
पोलिसांची जलद कारवाई - उत्तर प्रदेशातील हे प्रकरण फिरोजाबादचे आहे. बांगड्या वेल्डिंगचे काम करणाऱ्या मनोज राठोडने आपल्या १९ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपी वडिलांना अटक केली आहे. वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीचे एटा येथे राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील मुलासोबत प्रेमसंबंध होते.
आक्षेपार्ह अवस्थेत दोघे - प्रेमविवाह करण्यासाठी ती घरच्यांवर दबाव टाकत होती. वडिलांनी सांगितले की, त्यांच्या अनुपस्थितीत मुलीने 12 जुलैच्या रात्री मुलाला घरी बोलावले होते. त्यादिवशी मुलगा घरी आला होता. त्याला आक्षेपार्ह अवस्थेत दोघे दिसले होते. त्यामुळेच बापानेच तिची हत्या केली.
तपासानंतर कारण स्पष्ट - फिरोजाबादच्या ग्रामीण विभागाचे एसपी डॉ.अखिलेश नारायण यांनी सांगितले की, बापानेच मुलीची हत्या केली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. वडिलांनी खुनाची कबुली दिली आहे. चौकशीनंतरच ऑनर किलिंगबाबत काही सांगता येईल.