ETV Bharat / bharat

Odisha Health Minister Died : ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांचे उपचारादरम्यान निधन, पोलीस कर्मचाऱ्याने केला होता गोळीबार

ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविवारी एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. नाबा दास हे ब्रजराजनगर येथील गांधी चौकात एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. जखमी अवस्थेत त्यांना विमानाने भुवनेश्वरला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच मुख्यमंत्री पटनायक यांनी नाबा दास यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.

Odisha Health Minister Naba Das
ओडिशाचे आरोग्यमंत्री नब दास
author img

By

Published : Jan 29, 2023, 1:35 PM IST

Updated : Jan 29, 2023, 10:55 PM IST

ओडिशाच्या आरोग्यमंत्र्यांवर गोळीबार

झारसुगुडा (ओडिशा) : ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा दास यांच्यावर गोळीबार झाला होता. दास यांच्या छातीत गोळी लागली होती. ब्रिजराजनगर येथील कार्यक्रमादरम्यान त्यांच्यावर गोळीबार झाला होता. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते. दास एका कार्यक्रमाला जात असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांच्या उपस्थितीत गोळीबार झाल्याने घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

गोळीबाराचे कारण अस्पष्ट : मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्यांच्या कारमधून जात होते. कारमधून खाली उतरत असताना मंत्र्यावर 5 राऊंड गोळीबार करण्यात आला असून, एक गोळी त्यांच्या छातीत लागल्याचे वृत्त आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंत्र्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

  • Saddened by the unfortunate demise of Minister in Odisha Government, Shri Naba Kishore Das Ji. Condolences to his family in this tragic hour. Om Shanti.

    — Narendra Modi (@narendramodi) January 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एएसआयने केला गोळीबार : एसडीपीओ एएन ब्रजराजगढ म्हणाले, 'आरोग्यमंत्री एका कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी आले असताना गांधी चाचा पंडीचे एएसआय गोपाल चंद्र दास यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. गोळीबार का आणि कोणत्या परिस्थितीत झाला याची अचूक माहिती आमच्याकडे नाही. तपास सुरू आहे. खरी माहिती नंतर समोर येईल. प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल.' या घटनेचा तपास गुन्हे शाखा करणार आहे. गुन्हे शाखेचे पथक लवकरच झारसुगुडा येथे येणार असल्याची माहिती पोलिस कार्यालयाने दिली आहे.

प्रकरणाचा तयास सुरू - ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा किशोर दास यांच्यावर झालेल्या गोळीबाराबाबत बोलताना ब्रजराजनगरचे एसडीपीओ गुप्तेश्वर भोई यांनी रविवारी सांगितले की, या कृत्यात एक सहायक उपनिरीक्षक सहभागी होता. गोपाल दास नावाचा सहाय्यक उपनिरीक्षक गांधी चक येथे तैनात होता. सहाय्यक उपनिरीक्षक गोपाल दास यांनी मंत्री नाबा दास यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळीबार केला, अशी माहिती भोई यांनी दिली. भोई यांच्या म्हणण्यानुसार एएसआयने मंत्र्यांवर गोळीबार का केला याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. संबंधित अधिकाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

मानसिक स्थिती ठीक नव्हती - सहाय्यक उपनिरीक्षक गोपाल दास याच्या पत्नीने सांगितले की, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही. तो नियमित औषध घेतो आणि आज सकाळी मी त्याच्याशी बोललो. काय झाले काही कळेना. माझे पती (एएसआय गोपाल दास) हे मानसिक आजार आणि उच्च रक्तदाबाने त्रस्त होते. ते औषधोपचार करत होते. त्यांचे मंत्री नबादास यांच्याशी वैर होते की नाही हे मला माहीत नाही, असे गोळी झाडणाऱ्या एएसआय गोपाल दास यांच्या पत्नीने सांगितले.

नाबा दास यांच्या निधनामुळे राज्याचे मोठे नुकसान : नाबा दास यांच्या मृत्यूनंतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी शोक व्यक्त केला आहे. नाबा दास यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. पक्ष तसेच सरकारमध्ये त्याचे खूप महत्त्व होते. त्यांच्या निधनामुळे ओडिशा राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशा भावना नवीन पटनाईक यांनी व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा: IAF aircraft crash वायुसेनेच्या अपघातग्रस्त विमानांचे ब्लॅक बॉक्स कळणार नक्की कसा झाला अपघात

Last Updated : Jan 29, 2023, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.