डेहरादून - दिल्ली-डेहरादून शताब्दी एक्सप्रेसमधील सी-4 डब्याला आग लागली. ही घटना आज (शनिवारी) दुपारी बारा वाजेच्या सुमारास हरिद्वार आणि रायवाला कानसरोच्या जवळ घडली. सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तसेच कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती, उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली.
हेही वाचा - इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण
प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण -
दिल्लीहून डेहरादूनला जाणाऱ्या शताब्दी एक्सप्रेसमधील सी-4 डब्याला आग लागली. कानसरोच्या जवळ ही घटना घडली. कानसरो स्थानक राजाजी टायगर रिझर्व्हच्या कोअर परिसरात येते. आगीच्या घटनेनंतर या डब्याला वेगळे करण्यात आले आहे. तर सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वेळीच कानसरो रेंजच्या रेंजर आणि त्यांच्या स्टाफने तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. तर आगीच्या घटनेमुळे रेल्वेला काही काळ उशीर झाला आहे. तसेच रेल्वे प्रशासनामार्फत या प्रकाराची चौकशी करण्यात येत आहे.
हेही वाचा - भाजपाला धक्का, यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश