ETV Bharat / bharat

Fire Broke Out : घराला भीषण आग ; सहा जण जिवंत जळून खाक - Fire Broke Out In The House

मंचेरियल जिल्ह्यातील मंदामरी मंडळाच्या व्यंकटापूर येथे भीषण आगीची दुर्घटना घडली. ( Fire Broke Out In The House ) घराला आग लागून मालकासह सहा जण जिवंत जाळले.

Fire Broke Out
घराला आग
author img

By

Published : Dec 17, 2022, 8:38 AM IST

तेलंगाणा : घराला आग ( Fire Broke Out In The House ) लागून मालकासह सहा जण जिवंत जळून खाक झाले. मंचरयाला जिल्ह्यातील मंदामरी मंडलच्या व्यंकटापूरमध्ये ही भीषण आगीची घटना घडली. या अपघातात घराचा मालक शिवाय (50), त्याची पत्नी पद्मा (45), पद्माच्या मोठ्या बहिणीची मुलगी मौनिका (23), मौनिकाच्या दोन मुली आणि आणखी एक नातेवाईक शांतय्या यांचा मृत्यू झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. पोलिसांनी बचावकार्य केले. डीसीपी अखिल महाजन यांनी अपघाताच्या कारणांची माहिती घेतली.

या आधीही : कल्याण पश्चिम परिसरातील एका हायप्रोफाईल इमारतीमधील घराला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते. मात्र, वेळेतच अग्निमशन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली .

वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने आग : कल्याण पश्चिम भागात गोदरेज हिल परिसरात टेकडीवर कॅसोरीन नावाची हायप्रोफाईल इमारत आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर असलेल्या एका फ्लॅटमध्ये भीषण आग लागली होती. या फ्लॅटमधील वातानुकूलित यंत्रणेत बिघाड झाल्याने ही आग लागल्याची माहिती समोर आली होती. खळबळजनक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी काही सदस्य घरामध्येच होते. या आगीने काही वेळातच भीषण रूप धारण केल्याने संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले होते. ही आग एवढी मोठी होती की, गॅलरीमधून शेजारच्या घरांनाही आगीची झळ पोहचली होती . मात्र, कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे आग आटोक्यात आली आणि पुढील होणारी मोठी दुर्घटना टळली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.