गुमला : झारखंडच्या गुमला जिल्ह्यात विकास भवनमध्ये दिशा यांच्या सभेदरम्यान अचानक आग लागली. ज्यामुळे एकच गोंधळ उडाला. या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जून मुंडा ( union minister arjun munda ) , लोहरदगाचे खासदार सुदर्शन भगत ( Lohardaga MP Sudarshan Bhagat ), राज्यसभा खासदार समीर ओराव यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हॉलच्या फॅनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग ( Short Circuit In The Fan ) लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा कर्मचारी आणि काही अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई केली. पंखा खाली करून त्यावर पाणी टाकले. आग आटोक्यात आल्यानंतर बैठक पुन्हा सुरू करण्यात आली. या सर्व परिस्थीती दरम्यान, काही काळ तिथे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, तात्काळ आग शमवण्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.
Fire During Arjun Munda Meeting : केंद्रीय मंत्री अर्जून मुंडांच्या बैठकीदरम्यान विकास भवनमध्ये अचानक लागली आग - लोहरदगा खासदार सुदर्शन भगत
गुमला येथे दिशाच्या सभेदरम्यान खोलीत आग लागली. या बैठकीला केंद्रीय मंत्री अर्जून मुंडाही ( union minister arjun munda ) उपस्थित होते. तेथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात आणण्यात आली.