ETV Bharat / bharat

Mazhan Fire Incident : हिमाचल प्रदेशच्या मझान गावात भीषण आग, मंदिरासह २७ घरे जळून खाक

सीएम जय राम ठाकूर यांनी मझान आगीच्या (Fire In Mazhan Village Of Kullu) घटनेवर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी गावकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या संकटाच्या काळात आम्ही पीडित कुटुंबांसोबत आहोत, असे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (CM Jai Ram Thakur Expressed Over Mazhan Fire Inccident) म्हणाले.

मझान गावात भीषण आग
मझान गावात भीषण आग
author img

By

Published : Dec 12, 2021, 9:46 AM IST

कुल्लू: हिमाचल प्रदेशातल्या कुल्लू जिल्ह्यातील सेंज व्हॅलीमध्ये असलेल्या गडा परळी पंचायतीतील मझान गावात लागलेल्या भीषण आगीत (Fire In Mazhan Village Of Kullu) मंदिरासह 27 घरे जळून खाक झाली (Mazhan Fire Incident) आहेत. या आगीच्या घटनेत सुमारे नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मझान गावातील भीषण आगीच्या घटनेवर मुख्यमंत्री जय राम ठाकूर (CM Jai Ram On Mazhan Fire Incident) यांनी शोक व्यक्त केला आहे.

हिमाचल प्रदेशच्या मझान गावात भीषण आग, २७ घरे जळून खाक

मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांचे ट्विट

सीएम जय राम ठाकूर यांनी ट्विट (CM Jai Ram Thakur Tweet) केले की, “कुल्लूच्या मझान गावात 27 घरांना आग लागल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. बाधित कुटुंबांना तात्काळ मदत दिली जात असून, यासंदर्भात आम्ही स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या संकटाच्या काळात आम्ही पीडित कुटुंबांसोबत आहोत."

  • कुल्लू के मझाण गांव में आगजनी से 27 घरों में आग लगने वाली घटना अत्यंत दुःखद है।

    प्रभावित परिवारों को फौरी राहत प्रदान की जा रही है, इस संबंध में हमने स्थानीय प्रशासन को निर्देश दे दिए हैं।

    संकट की इस घड़ी में हम प्रभावित परिवारों के साथ हैं।

    — Jairam Thakur (@jairamthakurbjp) December 12, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज

कुल्लू जिल्ह्यातील बंजार उपविभागात सेंज तहसील अंतर्गत मझान गावात शनिवारी दुपारी ही आग लागली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बाधित लोकांच्या किंकाळ्या गावात दूरपर्यंत ऐकू येत होत्या. स्थानिक आमदार सुरेंद्र शौरी (MLA Surendra Shourie) यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचनाही दिल्या आहेत, जेणेकरून गावात मदतकार्य लवकरात लवकर पूर्ण करता येईल. या आगीत 27 घरे आणि 26 गोठे आणि दोन मंदिरे जळून खाक झाली आहेत. एकूण नऊ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

मोबाईलला सिग्नलही नाही

कोट्यवधी रुपये किमतीची ही सर्व घरे काथकुनी (लाकूड) शैलीत बांधण्यात आली आहेत. आगीचे लोळ पाहून संपूर्ण गावात एकच गोंधळ उडाला होता. गावापासून रस्ता दहा किलोमीटर अंतरावर आहे. इथे प्यायला पाणी नाही. संपूर्ण गाव एकमेव अशा नैसर्गिक जलस्रोतावर अवलंबून आहे. अशा स्थितीत गावकऱ्यांनी शेतातील माती उपसून जळणाऱ्या घरांवर टाकली. मात्र पाहता पाहता 27 घरांची राखरांगोळी झाली. या गावात मोबाईल सिग्नल नाही. त्यामुळे इतर गावकऱ्यांकडूनही मदत मिळू शकली नाही.

..तर गावाला आगीपासून वाचवता आले असते

राजेंद्र कुमार, पविंद्र कुमार, दिनेश, फता चंद, जगदीश, जवाहरलाल, निमत राम आणि लिखत राम यांनी सांगितले की, गावात आग लागल्याने गावकरी हादरले आहेत. थंडीच्या वातावरणात आता पाळीव प्राण्यांसोबत मोकळ्या आकाशाखाली रात्र काढावी लागणार आहे. या आगीच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. रस्ते, पाणी, सिग्नलसाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा शासनाकडे दाद मागितली आहे. अनेकवेळा शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधींची भेट घेतली, मात्र प्रत्येक वेळी दुर्लक्ष करण्यात आले. या सुविधा गावात असत्या तर घराला आगीपासून वाचवता आले असते. आता राखेचा ढिगारा पाहून रडण्याशिवाय मार्ग उरला नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.