नवी दिल्ली - येथील महाराष्ट्र सदनातील राज्यपालांच्या कक्षात आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, अजून आगीचे कारण समोर आलेले नाही.
अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, फायर कंट्रोल रूमला माहिती मिळाली की, महाराष्ट्र सदनमधील एका भागाला आग लागली. प्रकरणाचे गांभीर्य पाहता लगेचच अग्निशमन दलाचे गांभीर्य पाहता चार गाड पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ही आग राज्यपालांच्या कक्षात लागली. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागू शकते, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.