डेहराडून: हरिद्वार येथील धर्म संसदेत अल्पसंख्यांकांविरूध्द हिंसाचार भडकवल्याप्रकरणी जितेंद्र नारायण त्यागी आणि इतरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसीम रिझवी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी आणि इतर लोकांवर एका विशिष्ट धर्माविरूध्द भडकावू भाषणे देऊन द्वेष पसरवत असल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
हरिद्वार धर्म संसदेच्या 4 दिवसांनंतर आता ऋषीमुनींच्या वक्तव्यामुळे समाज माध्यमांवर खळबळ उडाली आहे. या विधानांचा निषेध केला जात आहे. अभभिनेत्री स्वरा भास्कर, माजी एमेरिकन टेनिसपटू मार्टिना नवारातिलोव्हा यांनी धर्म संसदेचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
धर्म समसदेतील वक्यांनी एका विशिष्ट समुदायाविरुध्द हिंसाचाराचे समर्थन केले होते आणि 'हिंदू राष्ट्र'साठी संघर्ष करण्याचे आवाहन केले होते. धर्मसंसदेत सुमारे 500 महामंडलेश्वर महंत आणि इतर 700 ते 800 संत होते. धर्म संसदेत जुना आखाडा महामंडलेश्वर यती नरसिंहानंद गिरी, रुरकीचे सागर सिंधुराज महाराज, संभावी धामचे आनंद स्वरुप महाराज, जुना आखाडा महामंडलेश्वर स्वामी प्रबोधानंद गिरी, निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर अन्नपुर्णा माॅं, पाटणाचे धर्मदास महाराज यांचा समावेश होता या सर्वांनी धर्म संसदेत मते मांडली होती.
हेही वाचा : Karnataka Anti-conversion Bill: कर्नाटकच्या धर्मांतर विरोधी कायदा मंजूर