ETV Bharat / bharat

MH MPs in Parliament : आमचं बोट धरून हिंदुत्व शिकले अन् आम्हालाच हिंदुत्वावरून शिकवता, शिवसेना खासदार जाधवांनी भाजपला सुनावलं - MH MPs in Parliament

जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

author img

By

Published : Feb 3, 2022, 4:47 PM IST

Updated : Feb 3, 2022, 11:05 PM IST

22:32 February 03

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झाली नाही, मात्र खतांचे भाव दुप्पट झाले : खासदार प्रतापराव जाधव

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना शिवसेनेचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्र सरकारचा चांगलाच समाचार घेतला. मोदी सरकारनं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन दिल होत. शेतकऱ्यांचं उत्पन्न तर वाढलं नाहीच मात्र, खतांचे भाव दुप्पट झाले, असं ते म्हणाले. २०२२ पर्यंत सर्वांना घरं देण्याचं मोदी म्हणाले होते. मात्र आता म्हणताहेत २०३० पर्यंत. या सरकार गरिबांना फक्त स्वप्न दाखवली. आयुष्यमान भारत योजना चांगली. पण किती गरिबांना पाच लाख रुपयांपर्यंत उपचारासाठी मदत मिळाली याचीही माहिती सर्वांना देणे आवश्यक आहे. राम मंदिर बनवायचं श्रेय सुप्रीम कोर्टाला जात. आम्ही संसदेत म्हणालो होतो. संसदेत कायदा आणा. पण सरकारने कायदा आणला नाही. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यावर मोदींनी राम मंदिराचं भूमिपूजन केलं. बाबरी पडली नसती तर राम मंदिर झालं नसत. बाबरी पडल्यावर भाजप, आरएसएस, विश्व हिंदू परिषद सगळे म्हणाले की आम्ही बाबरी पाडली नाही. ते म्हणाले शिवसेनेने बाबरी पाडली. बाळासाहेबांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की, बाबरी पाडणाऱ्या शिवसैनिकांचा मला अभिमान आहे. भाजप वाल्यांनी प्रमोद महाजन यांचे जुने भाषणं ऐकावेत. ते म्हणाले होते की हिंदूंचा एकमेव नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. राज्यात सरकार बदलल्यावर भाजपचे लोकं आमच्या हिंदुत्वावर तुम्ही टीका करता पण जेव्हा काश्मिरात तुम्ही सरकार स्थापन केले त्यावेळी तुम्ही कुणासोबत गेले होते. उत्तरप्रदेशात मायावतींना यांनी सपोर्ट केला. बिहारमध्ये नितीशकुमार यांचं नाव पंतप्रधान पदासाठी पुढे आल्यावर यांनी त्यांचे आमदार कमी असतानाही नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनवलं. ज्या शिवसेनेने २५ वर्षे तुम्हाला बोट धरून हिदुस्तानाचं हिंदुत्व तुम्हाला शिकवलं त्याच शिवसेनेवर हिंदुत्वावरून तुम्ही आज बोलताय, असा टोलाही जाधव यांनी लगावला. ३७० कलम काढल्यावर काय मिळालं? जे काश्मिरी पंडित विस्थापित झाले होते त्यांचं कुणाचं घर तुम्ही दोन वर्षात पुन्हा काश्मिरात वसवलं का? एखाद्या पंडिताला त्यांची जमीन मिळवून दिली का? फक्त जुमलेबाजी होत आहे. लोकांना फसवण्यात येतंय. सुजय विखेंनी भाषण केलं. पण त्यांचा जन्म झाल्यापासून खासदार बनेपर्यंत ते युपीएमध्येच होते, असेही ते म्हणाले.

22:13 February 03

मेरठमध्ये एमआयएम अध्यक्ष ओवेसी यांच्यावर जीवघेणा हल्ला. हल्ल्याचा निषेध सदनामध्ये व्हावा..

एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी लोकसभेत एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला असून, हल्ल्याचा निषेध सदनामध्ये करण्याची मागणी केली. ते म्हणाले की, सगळे चांगले चालले आहे असे राष्ट्रपतींच्या भाषणावरुन वाटले. ८० हजार लोकांनी अर्ज केले ५२ हजार लोक पात्र ठरले त्यापैकी फक्त ३५५ लोकांना घर मिळाले. २४९८ शेतकऱ्यांची राज्यात आत्महत्या केली. वसुलीला आल्यावर शेतकरी आत्महत्या करतात. देशात ५३ मिलीयन बेरोजगार आहेत. राज्यात वाईनची बाटली देण्याचे काम राज्य सरकार करत आहे. मात्र ते होऊ देऊ नये. रेल्वे पुढे चालली आहे. मात्र मराठवाड्याला काहीच मिळाले नाही. लिबर्टी, इक्वाटी, फ्रॅटर्नीटी जिवंत ठेवावी, असेही ते म्हणाले.

21:30 February 03

सुजय विखेंच्या टीकेला सुप्रिया सुळेंचं उत्तर

भाजपचे खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत पूर्वीच्या युपीए १ आणि युपीए २ च्या सरकारवर जोरदार टीका केली होती. त्याला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्त्युत्तर दिले. सुळे म्हणाल्या की, सुजय विखे यांनी युपीए सरकारवर टीका केली. पण मी त्यांना आठवण करून देऊ इच्छिते की, त्यावेळी त्यांचे वडील हे मंत्री होते. ते काँग्रेसमध्ये होते. त्यामुळे त्यांनी जी टीका केली ती स्वतःच्या वडिलांच्या विरोधात केली आहे. जे आमच्या संस्कारात बसत नाही. खाल्ल्या मिठाला जागा ही माझी संस्कृती आहे. हे माझ्या आईने मला शिकवलं आहे. दहा वर्षे त्यांचे वडील दिल्लीत येत होते. गांधी कुटुंबाशी त्यांचे चांगले संबंध होते. आता ते हे सर्व विसरून गेले असतील. खासदार ज्यावेळी एकमेकांच्या विरोधात बोलत असतात, त्यावेळी थोडी काळजी घ्यावी. इतिहास विसरू नका, असा सल्लाही सुळे यांनी विखेंना दिला.

वयोश्री योजनेविषयी खासदारांना माहित नसल्याचं सुजय विखे म्हणाले होते. त्यालाही सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले. त्या म्हणाल्या की, कदाचित आमचं त्यांच्याइतकं ( खासदार विखे ) वाचन नसेल. मात्र वयोश्री योजनेचा जो तीन चार वर्षातील डेटा आहे तो एकदा त्यांनी तपासावा. आणि पाहावं की देशातील कोणता मतदारसंघ गेल्या दोन तीन वर्षांपासून या योजनेला राबविण्यात पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे कुणी आभार मानत नसल्याचं विखे म्हणाले होते. त्यावर सुळे यांनी विखेंना 'माझं ट्विटर अकाउंट एकदा चेक करा. कुणी आमच्यासाठी काही चांगलं केलं तर मी त्या मंत्र्याचे आभार व्यक्त करत असते. चांगल्याला चांगलं बोलणे ही आमची संस्कृती आहे. हे फक्त मी माझं नाही सांगत तर सर्व विरोधी खासदारांचं ट्विटर चेक करावं, असंही त्या म्हणाल्या. विखे अजून नवे आहेत. त्यांना याबाबत माहिती नसेल. थोडं होमवर्क करून बोलले तर त्यांना अजून ५० वर्षे त्यांची राजकीय कारकीर्द चालेल, असंही त्या म्हणाल्या.

16:59 February 03

महाविकास आघाडीच्या नेत्यांना मोदीजींचा विकास दिसत नाही : खासदार सुजय विखे

अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजय विखे यांनी लोकसभेत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. विखे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या नेत्यांना एकतर मोदींनी केलेला विकास दिसत नाही किंवा ते विकास पाहू इच्छित नाहीत. अथवा त्यांच्या मनातील भावना बाहेर येत नाहीत. नितीन गडकरींनी महाराष्ट्रात अनेक विकासकामांचे उदघाटन केले. त्या कार्यक्रमांचे कोणतेही व्हिडीओ काढले तर त्यात महाविकास आघाडीचे मंत्री आणि खासदारच दिसून येत आहेत. मोदीजींनी निधी दिलेल्या कार्यक्रमात हे लोक दिसतात पण संसदेत याबाबत कुणीच बोलत नाही. नितीन गडकरींनी ५० टक्के सीआरएस फंड महाविकास आघाडीच्या नेत्यांना दिला आहे. पण हे लोक पंतप्रधानांचा उल्लेखही करत नाही. यावरून हेच दिसतंय की सेवा कुणीतरी करतंय आणि मेवा दुसराच खातोय. माझ्या मतदारसंघात गडकरींनी १० हजार किलोमीटरच्या रस्त्यांसाठी निधी दिला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असताना महाविकास आघाडीचे नेते मात्र फक्त टीका करत आहेत, असेही ते म्हणाले.

'सहकार मंत्रालय सुरु केलं हा सर्वात मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हे स्वातंत्र्यानंतर कधीच झालं नव्हतं. आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया शेतकऱ्यांचं बळकटीकरण हे सहकार क्षेत्रातूनच सुरु झालं आहे. माझ्या आजोबांनी आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरु केला. युपीए सरकारने शेतकऱ्यांची एफआरपी देण्यासाठी साखर कारखान्यांना फक्त कर्ज घेण्यास सांगितले. त्यामुळे दहा वर्षांच्या युपीएच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने बंद पडले. आणि महाविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांनी याच साखर कारखान्यांना कमी दरात खरेदी केले. हा त्यांचा समाजवाद आहे. आमच्या सरकारने साखर उद्योगाला बळ दिले. सबसिडी दिली. ३१०० रुपयांची एमएसपी फिक्स केली. साखरेचे दर नियंत्रणात आणले. इथेनॉलला प्रोत्साहन दिले. या सगळ्या निर्णयांचा लाभ महाविकास आघाडीच्या सर्व मंत्र्यांनी ज्यांचे कारखाने आहेत त्यांनी घेतला. त्याच्या मदतीने त्यांनी एफआरपी दिली. पण कधी मोदीजींची, त्यांच्या कामांची, योजनांची स्तुती केली नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

पेट्रोल डिझेलच्या किमतीवरून महाविकास आघाडीने आंदोलन केले. केंद्र सरकारने केंद्रीय एक्साइज ड्युटी कमी करून किमतीत घेत केली त्यावेळी राज्य सरकारनेही कर कमी करणे आवश्यक होते. पण त्यांनी कर कमी केला नाही. त्यांनी दारूवरील कर कमी केला. वाईन दुकानात विक्रीला ठेवण्याच्या निर्णयावरही त्यांनी टीका केली. महाविकास आघाडीची सत्तेची नशा जनता लवकरच उतरवेल, आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल, असा दावाही त्यांनी केला.

16:55 February 03

जलशक्ती योजनेत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असताना लक्षद्वीपचा समावेश का नाही? : खासदार फैजल मोहम्मद

जलशक्ती योजनेत सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेश असताना लक्षद्वीपचा समावेश का नाही? असा सवाल राष्ट्रवादीचे खासदार फैजल मोहम्मद यांनी संसदेत उपस्थित केला. लक्षद्वीपमध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे, असेही ते म्हणाले. त्यावर मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी उत्तर दिले. शेखावत म्हणाले की, लक्षद्वीपमध्ये ५ ठिकाणी काम सुरु असून, २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल. हा प्रदेश गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत येत असल्याने त्याचे नाव यादीमध्ये घेतलेले नाही. लोकसंख्येची घनता कमी असली तरी, यावर मोठा खर्च होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

16:47 February 03

राज्यातील पाणी योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी द्या : खासदार सुप्रिया सुळे

राज्यातील पाणी योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. त्यावर जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, देखभाल दुरुस्तीसाठी राज्यांना निधी देण्यात येत आहे. गेल्या वर्षीचा निधीही महाराष्ट्र सरकारकडे पडून आहे. यावर्षीही आम्ही निधीची तरतूद केली आहे. राज्य सरकारने त्यातून खर्च करावा.

16:30 February 03

जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

MH MPs in Parliament : जाणून घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

जलजीवन मिशनमध्ये एकापेक्षा जास्त गावांच्या योजनांचा समावेश करण्याची मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली.

Last Updated : Feb 3, 2022, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.