गाझियाबाद - साहिबाबाद औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात भीषण आग लागली. यामध्ये कारखान्यात उपस्थित 14 कामगार जखमी झाले. जखमींमध्ये दोन महिला आणि एक बालकही असल्याची माहिती आहे. अग्निशामक दलाचे 10 बंब घटनास्थळी पोहोचले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कारखान्यात वैद्यकीय उत्पादने बनविली जातात. आगीच्या वेळी मोठा आवाज ऐकू आला. मात्र, आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.
4 लोकांची प्रकृती गंभीर-
अपघातात जखमी झालेल्या 4 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांना सफदरजंग येथे हलवीण्यात आले आहे. स्फोटामुळे कारखान्याच्या इमारतीची भिंतही कोसळली. प्रसंगी एसएसपी आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांव्यतिरिक्त अग्निशमन दलाच्या गाड्या आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत. एसएसपी कलानिथी नैथानी म्हणाले की, इमारतीत कुणीही अडकले नाही, याची तातडीने तपासणी सुरू आहे. परंतु मोडतोड हटविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर हे पूर्णपणे स्पष्ट होईल.
मेडिकल बॅन्डेजमध्ये लागली आग -
येथे मेडिकल बॅन्डेजचे उत्पादन होते. यात कागद व रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. यामुळे आगी लागल्याचे बोलले जात आहे. मात्र, आगीचे कारण पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. याची पडताळणी केली जात आहे. कारखान्यात हजर असलेल्या मुलाचीही माहिती घेतली जात आहे. तो कोणाबरोबर येथे पोहोचला? त्याचबरोबर कारखान्यात अग्निशामक यंत्र होते का? याचीही चौकशी केली जाईल.
हेही वाचा- चिंताजनक! राज्यात गुरुवारी 14 हजार 317 कोरोनाबाधितांची वाढ