ETV Bharat / bharat

जुळ्या बहिणींची जगावेगळी माया! लग्नानंतर वेगळे होण्याच्या भीतीने आत्महत्या - Dipika Divya suicide

दोघींना लग्नामुळे वेगळे राहावे लागणार असल्याची कल्पनाच पसंत पडली नाही. त्यांनी दु:खी मनाने टोकाचे पाऊल घेतले. दिव्या व दीपिका यांनी शनिवारी सायंकाळी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली.

Fear of beinTwin sisters committed suicide ig separated
जुळ्या बहिणींची आत्महत्या
author img

By

Published : Jul 5, 2021, 9:28 PM IST

बंगळुरू- भावडांमध्ये विशेषत: जुळ्या भावडांमध्ये प्रेम अधिक असते, असे म्हटले जाते. पण, कर्नाटमध्ये जुळ्या बहिणींचे जगावेगळे व मन सुन्न करणारे प्रेम दिसून आले. लग्नानंतर विलग होण्याच्या भीतीने दीपिका व दिव्या या १९ वर्षीय जुळ्या बहिणींनी आत्महत्या केली. ही घटना कर्नाटकमधील मांड्या जिल्ह्यात घडली आहे.

दिव्या व दीपिका या श्रीरंगपटन तालुक्यातील हनसनहळ्ळी या गावातील रहिवाशी होत्या. त्यांनी शनिवारी सायंकाळी आत्महत्या केली आहे. त्या सुरेश आणि यशोधन यांच्या जुळ्या मुली होत्या. दोन्ही जुळ्या मुलींचे दोन विविध ठिकाणी लग्न जुळले होते. मात्र, त्या दोघींना लग्नामुळे वेगळे राहावे लागणार असल्याची कल्पनाच पसंत पडली नाही. त्यांनी दु:खी मनाने टोकाचे पाऊल घेतले. दिव्या व दीपिका यांनी शनिवारी सायंकाळी घरात फाशी घेऊन आत्महत्या केली. जुळ्या बहिणींच्या आत्महत्येने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. एरेकेरे पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा-केंद्रीय मंत्रिमंडळाचा ७ जुलैला विस्तार; महाराष्ट्रातून कोणाला मिळणार मंत्रिपद?

ताण-तणावात मानसिक उपचार तज्ज्ञांकडून घ्यावा सल्ला-

दरम्यान, ताण-तणावाच्या स्थितीत आत्महत्येचा पाऊल उचलण्यात येते. अशावेळी ताण-तणाव व्यवस्थापन, समुपदेशन असे विविध उपाय करावेत, असे मानसिक उपचार तज्ज्ञ सल्ला देतात.

हेही वाचा-मध्य प्रदेश : फोटोशुट करताना तीन मुले नदीत बुडाले; एकाला वाचविण्यात यश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.