चेन्नई - दिवसेंदिवस देशात कोरोना संसर्गाने गंभीर रुप धारण केले आहे. मोठ्या प्रमाणावर कोरोना संसर्ग होऊन कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केले आहे. दारूच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दारू विकत घेण्यासाठी लोकांची तारांबळ उडाली आहे. दारू मिळत नसल्याने तळीरामांची पंचाईत झाली आहे. बाप-लेकाच्या जोडीने यूट्यूबरवर व्हिडिओ पाहून घरीच दारू बनवली. तमिळनाडूच्या करूर जिल्ह्यातील कुप्पुचिपालयम गावात ही घटना घडली आहे.
![Father, son arrested for brewing alcohol at home by watching youtube](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/tn-krr-03-spirit-making-youtube-video-vangal-police-arrest-two-persons-crime-news-pic-scr-tn10050_03062021000614_0306f_1622658974_787_0306newsroom_1622705910_150.jpg)
गुणसेकरन या 55 वर्षीय असलेल्या एका व्यक्तीने आणि त्यांच्या 24 वर्षीय मुलगा जगदीशने यूट्यूबरवर व्हिडिओ पाहून घरीच दारू बनवली. मात्र, ते इथेच थांबले नाहीत. त्यांनी ही बनवलेली दारू विकण्याची योजना आखली.
मिळालेल्या माहितीच्या आधारे करुर विशेष दलाने गुणसेकरन यांच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी बाप-लेकाला अटक केली असून 8 दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तमिळनाडू राज्य सरकारने 10 मे रोजी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून, घरात दारू तयार करणार्यांची आणि अवैध दारू विक्रीच्या संख्येत वाढ झाली आहे.
विषारी मद्यपान केल्यामुळे 55 लोकांचा मृत्यू -
उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात विषारी मद्यपान केल्यामुळे आतापर्यंत 55 लोकांचा मृत्यू झाला आहे. पंजाब, मध्य प्रदेश, आसाममध्ये विषारी दारू प्यायल्याने मद्यपींचा मूत्यू झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. मध्य प्रदेशात विषारी दारूने 20 जणांचा बळी घेतला होता. तर पंजाबमध्ये विषारी दारू प्यायल्याने 104 जणांचा मृत्यू झाला होता. आसामच्या गोलाघाट आणि जोराहात जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्यामुळे तब्बल 83 लोकांचा मृत्यू झाला होता.